corona 
जळगाव

रुग्ण संख्येचा आता ‘डाऊनफॉल’ होणार 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात आजच्या स्थितीत कोरोना बाधीत ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या साडेबारा हजार आहे. हा मोठा उच्चांक आहे. आगामी आठ दहा दिवसात हा आकडा खाली येण्यास सुरूवात होणार आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन अधिक सतर्कता बाळगणार आहे. काही दिवसांपूर्वी ऑक्सीजन बेडची कमतरता जाणवत होती. तीही आता नाही. ऑक्सीजन बेड पुरेसे आहेत. व्हेटीलेटरही आहेत. कमी पडले तरी आपण उपलब्ध करू शकतो. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिली. 

जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांच्या ॲक्टीव रुग्णांची संख्येने शिखर गाठला आहे. आगामी आठ ते दहा दिवसात हा शिखर खाली येण्यास सुरवात होईल. जिल्हा आरेाग्य यंत्रणेकडे ऑक्सीजनचे पुरेसे बेड नव्हते. मात्र आपण मोहाडीत महिला रुग्णालयात पाचशे बेडचे हॉस्पीटल सुरू केले आहे. त्यात शंभर बेड ऑक्सीजनचे तर दोनशे बेड सीसीसी सेंटरमध्ये आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोणाला ऑक्सीजनची गरज पडली तर त्यांना या रुग्णालयात शिफ्ट केले जाते. 

ऑक्सीजनचा वापर काटकसरीने हवा 
जिल्ह्यातील बाधीत रुग्णांना ऑक्सीजन लागतो. रोज ४०-४५ टन ऑक्सीजनची गरज असते. आपली कॅपीसिटी ५० टन ऑक्सीजन साठविण्याची आहे. यामुळेच आपण जिल्ह्यात तयार होणारा ऑक्सीजन केवळ वैद्यकीय कामांसाठी राखून ठेवण्याचे सांगितले आहे. सोबतच रुग्णांना विनाकारण ऑक्सीजन लावला जातो. तो कमी करण्यास सांगितले आहे. गरज असेल तरच ऑक्सीजन लावा. ज्यांचे सॅच्यूरेशन ९४ पर्यंत आहे अशांनाही ऑक्सीजन सुरूच असतो, हे चूकीचे आहे. यामुळे गरज असलेल्यांना ऑक्सीजन देण्याचे आदेश आरेाग्य यंत्रणेसह खासगी डॉक्टरांना दिले आहे. भविष्यात ऑक्सीजनची टंचाई जाणवू नये यासाठी आतापासूनच काळजी घेत ऑक्सीजन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

‘रेमडेसिव्हर’ गरजूंनाच द्यावे 
सध्या रेमडेसिव्हरचे उत्पादन घटल्याने त्याची टंचाई आहे. असे असताना खासगी डॉक्टर कोणत्याही रुग्णाला ‘रेमडेसिव्हर’ लावतात. ‘आयसीएमआर’ या आरोग्य संघटनेने रेमडेसिव्हर कोणत्या रुग्णाला द्यावे. याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याचा वापर डॉक्टरांनी करावा. कोणत्याही रुग्णाला गरज नसताना त्याला दिल्यास त्याचे दूष्परिणाम रुग्णाला होवू शकतात. यामुळे सर्व खासगी डॉक्टरांना रेमडेसिव्हरचा वापर गरजू रुग्णांसाठीच करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. आता रेमडेसिव्हर रुग्णांच्या नातेवाईकांना लिहून न देता डॉक्टरांनीच त्यांच्या मेडीकलमधून द्यावे. त्याचे बिल रूग्णाला डिस्चार्ज देताना द्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहे. यामुळे रुग्णाला रेमडेसिव्हरसाठी भटकंती करावी लागणार नाही. रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडेसिव्हर नियंत्रण कक्षात फोन करून आपली मागणी नोंदविल्याची नोंद करून घ्यावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT