crime
crime 
जळगाव

सिगारेट दिली नाही म्हणून चाकूने वार 

रईस शेख

जळगाव : शाहूनगरात सिगारेट मागण्याच्या वादातून एकाने दुकानदाराला बेदम मारहाण करून चाकूने वार करत गल्ल्यातील पाच हजारांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी (ता. ९) रात्री अकराच्या सुमारास घडली. शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 
जखमी मुजमिल शेख इब्राहिम (वय २१, रा. शाहूनगर) यांचे किरकोळ विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दुकान बंद करून दुकानाजवळील कचऱ्याची विल्हेवाट लावताना संशयित आरोपी शेख अल्तमश ऊर्फ सत्या शेख शाकील (वय १९, रा. इंदिरानगर, शाहूनगर) हा दुकानाजवळ येत त्याने सिगारेट मागितली. दरम्यान, टपरीधारकाने दुकान बंद केल्याचे सांगितल्याने त्याचा राग आल्याने शेख अल्तमश याने मुजमिल याला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तसेच चाकूने वार करून गल्ल्यातील चार ते पाच हजार रुपयांची रोकड हिसकावून पळ काढला. टपरीधारक मुजमिल शेख इब्राहिम यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील संशयित आरोपी अल्तमशला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक गणेश बुवा तपास करीत आहेत. 

धानोऱ्यातून गावठी दारू जप्त 
धानोरा बुद्रुक येथे घराच्या शेजारीच बेकायदा गावठी दारूचा गुत्ता लावणाऱ्या दिगंबर सोनवणे (वय ५९) या व्यक्तीस रविवारी (ता. १०) तालुका पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ७५० रुपयांची १५ लिटर गावठी दारू जप्त केली. धानोरा बुद्रुक येथे दिगंबर सोनवणे गावठी दारूची विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी अनिल फेगडे, विलास पाटील, मनोज पाटील, सतीश हाळनोर, हरिलाल पाटील, विजय दुसाने यांच्या पथकाला कारवाईची सूचना केली. त्यानुसार पथकाने रविवारी सकाळी बाराच्या सुमारास कारवाई करून सोनवणे यास ताब्यात घेतले व त्याच्याकडून १५ लिटर ७५० रुपये किमतीची गावठी दारू जप्त केली.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT