eknath khadse
eknath khadse 
जळगाव

ईडीच्‍या चौकशीला सामोरे जावून सहकार्य करणार : खडसे

राजेश सोनवणे

जळगाव : भोसरी येथील भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ईडीने नोटीस पाठविली असून या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. ईडी ज्‍या ठिकाणी आणि जेव्हा बोलवेल तेथे पुर्ण कागदपत्रांसह उपस्‍थित राहणार असल्‍याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत स्‍पष्‍ट केले.
ईडीची नोटीस मिळाल्‍यानंतर त्‍याबाबत आपले मत मांडण्यासाठी खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात खडसे यांनी सांगितले, की भोसरी येथील भूखंड खरेदीप्रकरणी यापुर्वी चार वेळेस ईडीची नोटीस मिळाली आहे. आता मिळालेली नोटी ही पाचवी असून, त्‍यास पुर्णपणे सहकार्य करणार असून ३० डिसेंबरला उपस्‍थित राहण्याचे नोटीसीत म्‍हटले आहे. यापुर्वी देखील आयटीबाबत झालेल्‍या चौकशीला पुर्ण कागदपत्रांसह उपस्‍थित राहून सहकार्य केले. त्‍याचप्रमाणे ईडीला देखील सहकार्य राहणार असल्‍याचे खडसेंनी स्‍पष्‍ट केले. 

द्वेषापोटी नाथाभाऊंवर आरोप : जिल्‍हाध्यक्ष पाटील
ज्‍येष्‍ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दोन महिन्यापुर्वी राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्‍यावेळीच नाथाभाऊंनी म्‍हटले होते की ईडीची नोटीस येणार; पण त्‍यास सक्षमपणे उत्‍तर देणार. आता ईडीची नोटीस आली असली त्‍यास नाथाभाऊ सक्षमपणे उत्‍तर देतीलच; पण जिल्‍ह्‍यात राष्‍ट्रवादी संघटीत झाल्‍याचे पाहून द्वेषापोटी हा प्रकार झाल्‍याचे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT