devendra fadnavis devendra fadnavis
जळगाव

शेतकऱ्यांना नुकसानीची सरसकट मदत द्या : देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना नुकसानीची सरसकट मदत द्या ः देवेंद्र फडणवीस

राजेश सोनवणे

जळगाव : पावसामुळे सर्व उघड्यावर पडले आहे. मागच्या नुकसानीचेच पैसे आणि पिक विम्‍याची मदत देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. विमा कंपनी देखील येत नसल्‍याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत असून यामुळे शेतकऱ्यांनी विमाच (Farmer crop insurance) काढला नसल्‍याची स्‍थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांना अडचण येवू नये; या दृष्‍टीने शेतकऱ्यास तात्‍काळ नुकसान भरापाई मिळावी; अशी मागणी सरकारकडे करणार असल्‍याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. (jalgaon-news-farmer-Devendra-Fadnavis-help-to-farmers-for-loss)

मुक्ताईनगर व रावेर वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) हे जळगाव जिल्‍ह्‍याच्या दौऱ्यावर आले होते. नुकसानीची पाहणी झाल्‍यानंतर त्यांनी नायगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत सदरची माहिती दिली.

विरोधी पक्षनेते फडणवीस म्‍हणाले, की केळी बागाचे शंभर टक्‍के नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांशी चर्चा केली असता त्‍यांना नुकसान भरपाईच मिळालेली नाही. मुळात शेताची सफाई करावी लागणार आहे. त्‍यासाठीची सुरवातीला मदत करावी. तसेच अनेक ठिकाणी घरांचे देखील नुकसान झाले असून असा संपुर्ण नुकसानीचा अहवाल राज्‍य सरकारकडे सादर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी फडणवीस यांनी यावेळी केली आहे. तसेच मागील वर्षी हरिभाऊ जावळे समितीचे सर्व निकष बदलवण्यात आले आणि नव्या निकषाने केळीच्या विम्याचा हा टेंडर काढला गेला. त्यामुळे विमा कंपन्यांचा आता अधिक फायदा होत आहे. परंतु, हरिभाऊ जावळे समितीचे जे निकष होते, त्या निकषानुसारच केळीचा विमा उतरवला गेला पाहिजे आणि शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे असे फडणवीस म्हणाले.

त्‍यांनी केलेली मागणी आता पुर्ण करावी

यापुर्वी म्‍हणजे २०१९ मध्ये झालेल्‍या अतिवृष्‍टीमध्ये देखील खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्‍यावेळी आताचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी ५० हजाराची आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक लाखाची मदत करण्याची मागणी त्‍यावेळी केली होती. यामुळे आताच्या नुकसानीबाबत आम्‍ही कोणत्‍याही प्रकारची मागणी करणार नसून केवळ त्‍यांनी केलेली मागणी आता पुर्ण करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News: पालघर-संभाजीनगर बसला अपघात, 25हून अधिक प्रवासी जखमी

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT