g s society
g s society 
जळगाव

ग.स. सोसायटीच्या संचालकांचे बंड; अध्यक्षांची मनमानी म्‍हणत दिले १४ जणांनी राजीनामे 

सचिन जोशी

जळगाव : जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात, ग.स. सोसायटीचे काळजीवाहू अध्यक्ष मनोज पाटील यांनी संस्थेत मनमानी कारभार सुरू केला असून, संचालकांना विश्‍वासात न घेता निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे संस्थेतील विरोधी गटातील नऊ व सत्ताधारी गटातील पाच अशा १४ संचालकांनी राजीनामा देत बंड पुकारले. मंडळ तत्काळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणीही या संचालकांनी केली आहे. 
४० हजारांवर सभासद असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स. सोसायटीतील संचालक मंडळातील सत्ताधारी- विरोधकांमधील वाद जिल्ह्याला नवे नाहीत. या वादातून संस्थेतील संचालक मंडळाच्या सत्तेची उलथापालथही नेहमीच जिल्ह्याने अनुभवली आहे. 

संचालक मंडळास मुदतवाढ 
विद्यमान संचालक मंडळाची कार्यकाळ खरेतर मे २०२० मध्येच संपला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गेल्या वर्षभरात विविध सहकारी व अन्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या. ग.स. सोसायटीच्या संचालक मंडळासही मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येऊन अध्यक्ष मनोज पाटील यांना काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम पाहण्यास सूचित करण्यात आले. 

अध्यक्षांवर आरोप 
यादरम्यान विरोधी सहकार गटाच्या नऊ संचालकांनी गेल्या ३० सप्टेंबर २०२० ला संस्थेच्या जामीन व विशेष कर्जावरील व्याजदरात १ टक्का कपात करण्याबाबत निवेदन दिले होते. मात्र, अध्यक्ष मनोज पाटील यांनी त्यावर सहकार गटाच्या नऊ संचालकांनी संस्थेची बदनामी केल्याचे सांगत संचालकांना सभासदत्व रद्द का करण्यात येऊ नये, अशी बेकायदा नोटीस बजावल्याचा या संचालकांचा दावा आहे. या काळात अध्यक्षांनी मनमानी करून संचालकांना विश्‍वासात न घेता हुकूमशाही पद्धतीने कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे सहकार गटाचे नऊ व लोकसहकार गटाचे पाच अशा १४ संचालकांनी आपले राजीनामे जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केले आहेत. 

प्रशासक नियुक्तीची मागणी 
संस्थेच्या २१ पैकी आता १४ संचालकांनी राजीनामे दिल्यामुळे संस्थेचा कोरम पूर्ण होत नाही. त्यामुळे अध्यक्षांना कुठल्याही प्रकारचे कामकाज करण्याचा अधिकार नाही. परिणामी, संस्थेवर तातडीने प्रशासक नियुक्ती करून, नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी या संचालकांनी केली आहे. 

यांनी दिले राजीनामे 
राजीनामा दिलेल्या संचालकांमध्ये उदय पाटील, विलास नेरकर, तुकाराम बोरोले, सुनीता पाटील, अजबसिंग पाटील, कैलास चव्हाण, महेश पाटील, देवेंद्र पाटील, सुनील पाटील, विश्‍वासराव सूर्यवंशी, विद्यादेवी पाटील, विक्रमादित्य पाटील, भाईदास पाटील, रागिणी चव्हाण यांचा समावेश आहे. 

गेल्या अनेक वर्षांत आपल्या अध्यक्षपदाची कारकीर्द प्रभावी ठरली आहे. गेल्या वेळच्या सभेपर्यंत ही मंडळी सोबत होती. संचालक मंडळास मुदतवाढ मिळाल्यानंतर कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे असताना मी मनमानी पद्धतीने कामकाज करतोय, या आरोपात तथ्य नाही. विरोधी गटाच्या उदय पाटील व मंडळींना असे निराधार आरोप करण्यात धन्यता वाटते. त्यांच्या आरोपांना आपण सभासदांसमोर जात उत्तर देऊ. 
- मनोज पाटील, अध्यक्ष, ग.स. सोसायटी 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT