shiv bhojan thali
shiv bhojan thali shiv bhojan thali
जळगाव

शिवभोजन केंद्रावरील थाळ्यांमध्ये वाढ; १४ मेपर्यंत वाढीव थाळ्या

देवीदास वाणी

जळगाव : लॉकडाउनच्या काळात बेघर, गरजू, निराधार, मजुरांना राज्य शासनाचे शिवभोजन केंद्र मोठा आधार ठरत आहे. सध्या संचारबंदी असल्याने मजुरांचे हाल होऊ नये, यासाठी राज्य शासनाने प्रत्येक शिवभोजन केंद्रावरील थाळ्यांच्या संख्येत वाढ केली आहे. जेणे करून अधिकाधिक गरजूंना मोफत शिवभोजन थाळीचा लाभ मिळू शकेल.

जळगाव जिल्ह्यात बेघर, गरजू, निराधार, मजूर नागरिकांना अल्प दरात ३८ शिवभोजन केंद्रावर ३,४२५ थाळ्यांना मान्यता देण्यात आली होती. त्या वेळी दहा रुपये थाळी होती. आता लॉकडाउनमुळे मोफत थाळी मिळत आहे. लॉकडाउनमुळे प्रत्येक शिवभोजन केंद्रावर १५ एप्रिल ते १४ मे २०२१ या कालावधीत मोफत थाळ्यांमध्ये दीडपटीने वाढ करण्यात आली आहे.

३८ केंद्रावर लाभ

जिल्ह्यात शासनाच्या मंजूर असलेल्या ३८ केंद्रांवर अल्पदरात ३,४२५ थाळी भोजनाचा लाभ देण्यात येत होता. तसेच राज्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत बेघर, गरजू, निराधार, मजूर, स्थलांतरित मजूर, ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना जेवणापासून वंचित राहावे लागू नये म्हणून या अनुक्रमे जळगाव शहरात १४ केंद्रांवर प्रत्येकी ७५, यावल, रावेर, चाळीसगाव येथे प्रत्येकी दोन, तसेच भडगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा आणि जळगाव येथे प्रत्येकी एक केंद्रावर प्रत्येकी शंभर याप्रमाणे, तर भुसावळ येथे दोन केंद्रांवर अनुक्रमे १२५ आणि १५०, तर मुक्ताईनगर येथे एका केंद्रावर २२५ असे एकूण ३,४२५ अल्पदरात थाळी भोजनाचा लाभ मंजूर करण्यात आला होता.

सद्यःस्थितीत शिवभोजन थाळीच्या उद्दिष्टांत ज्याठिकाणी ७५ थाळ्या आहे तेथे ११२ किंवा शंभर असतील. जेथे १५०, १२५ असतील तेथे १८७ आणि २२५ आहेत तेथे ३३७, असे एकूण ५,१२५ मोफत थाळ्यांचे उद्दिष्ट १५ एप्रिलपासूनच वाढविण्यात आले आहे. १४ मेपर्यंत एक महिना कालावधीत हा लाभ देण्यात येणार आहे.

-सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी

संपादन- राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT