gharkul scheme gharkul scheme
जळगाव

‘महाआवास’ अभियानातून ई- गृहप्रवेश

‘महाआवास’ अभियानातून ई- गृहप्रवेश

सकाळ डिजिटल टीम

यावल (जळगाव) : महाआवास अभियान अंतर्गत ग्रामीण पातळीवरील ई– गृह प्रवेश कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थित येथे पंचायत समितीच्या सभागृहात झाला. (jalgaon-maha-aawas-yojana-gharkul-scheme-yawal-panchayat-samiti)

ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्राम विकास विभाग मार्फत पुढील शंभर दिवसात राबवण्यात येणाऱ्या महाआवास अभियानाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या अभियानाद्वारे ग्रामीण भागात सुमारे ८.८2 लाख घरकुलाची निर्मिती करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सर्वांनी एकत्रित सहभागातून अभियान यशस्वी करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

घरकुल निर्मितीला गती द्यावी

ग्रामीण भागात ‘महाआवास’ अभियानातून 'घरकुल आवास अभियान- ग्रामीण’ अभियान राबविणे राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून नोव्हेंबर २०२० ते २८ नोंव्हेबर २०२१ या कालावधीत शंभर दिवसीय ‘महा आवास अभियान- ग्रामीण’ अभियान संपुर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण, शबरी आवास योजना अशा विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांनी येत्या शंभर दिवसात शंभर टक्के उद्दीष्ट पूर्ण करावे. ‘महा आवास’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण घरकुल निर्मितीला गती द्यावी आणि आपल्या क्षेत्रातील विभागाला प्रथम क्रमांकावर आणावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तालुक्यातील स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना केले. याप्रसंगी येथील पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरूजित चौधरी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, अखिल भारतीय सरपंच परिषदचे जिल्हा अध्यक्ष पुरुजित चौधरी, ग्रामीण गृह अभियंता अझरुददीन फारुकी, ग्रामीण अभियंता किरण सपकाळ, घरकुल विभागाचे संगणक संचालक मिलींद कुरकुरे, जावेद तडवी, अक्षय शिरसाडे, रौनक तडवी आदी या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

अतिक अहमदच्या धाकट्या लेकासह दोघांचा अपघातात मृत्यू, तुरुंगातल्या भावाला भेटून परतताना दुर्घटना

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी उचलले ७४.७५ लाख; वसुलीला सुरुवात

रवि किशन यांना लेकीनेच केलं ट्रोल; रिव्हाचा भन्नाट Reel पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, Viral Video

Marathi News Live Updates : झाशीहून प्रयागराजला परतताना भीषण अपघात; अतीक अहमदचा धाकटा मुलगा अबान अहमदचा मृत्यू

SCROLL FOR NEXT