missing police complant
missing police complant 
जळगाव

दोन दिवस व्हॉटस्‌ॲपवर फिरली हरविल्‍याची पोस्‍ट; तिसऱ्या दिवशी आढळला मृतदेह

विनोद सुरवाडे

वरणगाव (जळगाव) : येथील प्रभागा क्रमांक एकमधील झोपे वाड्यात राहणारे चांगो रामदास झोपे (वय 69) हे 29 जानेवारीला घरातून अचानक निघुन गेले. वरणगाव पोलिसात त्यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने तपास करतांना सदर व्यक्‍तीचा पाल जवळील बोर घाटात संशयास्पद मृतदेह आज सकाळी आढळून आला. यामुळे वरणगावात खळबळ उडाली. 

वरणगाव येथील झोपे वाडा परिसरातील राहणारे चांगो झोपे (वय 69) हे येथील आयुध निर्माणीमधील सेवानिवृत्त कर्मचारी असुन साधी राहणीमान स्वच्छ विचारसरणीचे म्‍हणून परिचित होते. गेल्या काही दिवसांपासुन त्यांचा मुलगा राकेश झोपे (पोलिस कर्मचारी सावदा) व आयुध निर्माणीमध्ये अधिकारी म्‍हणून कार्यरत असलेली सुन जयश्री राकेश झोपे हे बाहेरगावी गेले होते. 

मुलगा- सुन घरी आले तेव्हा..
बाहेरगावी गेलेले दाम्‍पत्य घरी परत आले असता त्यांचे वडील घरी आढळून आले नाही. मुलांसह परीसरातील राजकिय पदाधिकाऱ्यांनी चांगो झोपे यांचा आजूबाजूचा परीसर पिजून नातेवाईकांकडे संपर्क करून बघितला. मात्र कुठेच मिळून आले नाही. मुलगा पोलिस कर्मचारी असल्याने त्यांच्या फिर्यादीवरून हरविलेल्याची नोंद वरणगाव पोलिस स्थानकात करण्यात आली होती. 

५१ हजाराचे बक्षिसही जाहीर केले पण
घरांतील सदस्यांनी हरवलेली व्यक्तीचा तपास सांगणाऱ्याला 51 हजार रूपयांचे बक्षीस देखील जाहिर केले. असे असतांना आज (ता. 1) सकाळी सावदा पोलिसांना पालजवळील बोर घाटात मृतदेह संशयास्पद आढळून आल्याने वरणगाव येथ खळबळ उडाली. वरणगाव पोलिसांत हरवल्याची नोंद असल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपकुमार बोरसे यांनी घटनेच्या तपासात एक संशयीत ताब्यात घेतला असुन दोघांचा मागावर पोलिस यंत्रणा आहे. 

हाताच्या पाचही बोटात होत्‍या सोन्याच्या अंगठ्या
मुलाच्या फिर्यादीनुसार मयत झोपे यांच्याकडे बोटांमध्ये पाच- सहा सोन्याच्या अंगठ्या, मनगटात ब्रेसलेट, गळ्यात सोनसाखळी असे दागिने होते. अशाच पद्धतीची अपहरण करून 3 ते 4 वर्षापुर्वी एका 55 वर्षीय व्यक्‍तीची हत्या करण्यात आल्‍याचे बोलले जात असून, त्यातील मोरकऱ्यांचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही. 

संपादन ः राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT