bhagat balani accident
bhagat balani accident 
जळगाव

मनपा गटनेते बालाणींच्या कारला गुजरातमध्ये अपघात; सारेजण सुखरूप 

रईस शेख

जळगाव : महापालिकेत भाजपचे गटनेते असलेल्या भगत बालाणी यांच्या कारला सोनगड (गुजरात) जवळ अपघात झाला. कार दुभाजकावर उलटून चेंदामेंदा झाली. भगत बालाणी चालवत असलेल्या या कारमध्ये त्याची मुलगी, दोन नात आणि मित्र असे पाच लोक होते. अपघातानंतर कारने दोन पलट्या घेतल्यानंतरही एअरबॅग उघडल्याने आतील सर्वजण वाचले. 
सिंधी कॉलनी येथील रहिवासी, भाजप नगरसेवक भगत बालाणी यांची मुलगी सोनम संजणानी अहमदाबाद (गुजरात) येथे वास्तव्यास आहे. सोनम या त्यांच्या दोन्ही मुलींसह माहेरी जळगावला आल्या होत्या. मुलगी व नातींना सेाडवण्यासाठी स्वतः भगत बालाणी कार घेवून निघाले होते. मित्र, सुरेश मंधान यांना सोबत घेत, मारुती ब्रिझ्झा (एमएच.१९.सीएफ,७१०८) वाहनाने सकाळी घरुन निघाले. 

कारवरचे नियंत्रण सुटले
प्रवासातच दुपारच्या जेवणानंतर वाहन सोनगड- व्यारा दरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास चालक भगत यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले अन्‌ क्षणार्धात कारने देान-तीन वेळा पलट्या घेतल्या. अपघातात भगत बालाणी बेशुद्ध झाले. सुरेश मंधाण, मुलगी सेानम संजणानी, नाती जिनीशा (वय-९), त्रिशा (वय-२) यांना किरकोळ दुखापत झाली असून जवळच्या पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT