flowering bamboo farming
flowering bamboo farming 
जळगाव

माळरानावर फुलविली बांबू शेती; पारंपरिक पिकाला पर्याय 

संजय पाटील

पारोळा (जळगाव) : शेती म्हणजे हातबट्ट्याचा व्यवसाय, शेती करणे परवडत नाही, अशी ओरड नेहमीच होते. मात्र, पारंपरिक शेतीला जर आधुनिकतेची जोड दिली तर चांगले उत्पन्न घेता येते, हे मोरफळ (ता. पारोळा) येथील दोन होतकरू तरुणांनी दाखवून दिले आहे. संदीप माळी याने आपल्या वडिलोपार्जित शेतीत परिवर्तनाची बीजे रोवून बांबूची लागवड केली. ही प्रयोगशील शेती कसताना त्याला मित्र उमेश सोनारची भक्कम साथ लाभली आणि आज या तरुणांनी माळरानावर बांबूची शेती फुलवून यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. विशेष म्हणजे, संदीपने नोकरीला तिलांजली देत जिल्ह्यातच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात बांबू पिकातून उत्पन्नाचा वेगळा दर्जा विकसित केला आहे. 
शेतकरी चूडामण माळी हे थोरला मुलगा विनोदच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने शेती करून मिळेल त्या उत्पन्नावर समाधान मानून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, त्यांचा धाकटा मुलगा संदीप माळी याने शेतीत रस घेऊन पारंपरिक पिकाला पर्याय देत शेतीत परिवर्तन केले आहे. 

मोरफळ शिवारात वनशेती 
पारंपरिक शेतीपलीकडेदेखील आपण वेगळे काही करू शकतो, या भावनेतून संदीप माळी यांनी केरळ व आसाम परिसरात अभ्यास दौरे करीत केरळ फाँरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट येथे बांबूवर प्रशिक्षण घेऊन आपला परिसर वनशेतीतून सुजलाम् सुफलाम् कसा होईल, या भावनेतून वाटचाल करताना मोरफळसारख्या खडकाळ जमिनीची योग्य ती मशागत करून या परिसरात वनशेतीदेखील करता येऊ शकते हे मेहनतीतून सिद्ध करीत संदीप माळी व उमेश सोनार या जोडगोळीने मोरफळ शिवार वनशेतीतून समृद्ध केला आहे. 

इतरांनाही प्रोत्साहन 
बांबू शेतीच्या चार जातीत त्यांनी ही वनशेती समृद्ध केली असून, एकरी ४०० झाडांची लागवड केली तर लाखो रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार असून, बांबू शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा, यासाठी संदीप माळी यांची वाटचाल सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील काही गावांसह धुळे, नंदुरबार, मालेगाव, नाशिक येथील शेतकऱ्यांनादेखील या तरुणांनी प्रोत्साहित केले आहे. 

बांबूत आंतरपीक 
शेतकऱ्यांना दोन फुटांचे बांबू रोप दिले जात असून, त्याचे संगोपन व वाढ होत असताना आंतरपीक म्हणून कापूस, सोयाबीन, भाजीपाला, आद्रक, काळी मिरी, पानवेल व कापूस हीदेखील पिके घेऊन शेतकरी आपला उत्पन्नाचा दर वाढवू शकतो. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात किंवा बांधावर बांबू शेती केली तर विकासाचा दर निश्चितच वाढू शकेल, त्यासोबत पूरक उद्योगही उदयास येतील, असा विश्‍वास श्री. माळी व सोनार यांना आहे. 

पुणे येथे पर्यावरणप्रेमी कार्यक्रमात बांबू शेतीबाबत माहिती मिळाली. आपणदेखील ही शेती आपल्या परिसरात विकसित केली तर कुटुंबाला हातभार लागेल, या भावनेतून वाटचाल करताना आज तालुक्यासह इतर जिल्ह्यांत बरेच शेतकरी बांबू शेती करून आपली प्रगती करीत समाधानी जीवन जगत आहेत. इतर शेतकऱ्यांना बांबू पिकाबाबत माहिती हवी असल्यास ७७२०९४७८४० यावर संपर्क करावा. 
-संदीप माळी, मोरफळ (ता. पारोळा) 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT