Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत, कोणते शेअर्स घसरले?

Sensex-Nifty Today: आज सोमवारी (29 एप्रिल) जागतिक बाजारातून मिळालेल्या तेजीच्या संकेतानंतर बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सेन्सेक्स-निफ्टी बाजारात चांगली वाढ झाली.
Share Market
Share Market Sakal

Share Market Opening Latest Update 29 April 2024 (Marathi News): आज सोमवारी (29 एप्रिल) जागतिक बाजारातून मिळालेल्या तेजीच्या संकेतानंतर बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सेन्सेक्स-निफ्टी बाजारात चांगली वाढ झाली. सेन्सेक्सने 340 अंकांची वाढ नोंदवली आणि निफ्टी 22,500 च्या वर पोहोचला.

Sensex Today
Sensex TodaySakal

फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीचे निकाल या आठवड्यात येणार आहेत. गेल्या दशकात प्रथमच जपानी येनच्या तुलनेत डॉलर मजबूत झाला आहे. 1 डॉलरचे मूल्य आता 160 येन आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत एक टक्का घसरण झाली आहे.

प्री-ओपन मार्केटमध्ये, BSE सेन्सेक्स 520 अंकांच्या वाढीसह 74,250 अंकांच्या पातळीवर काम करत होता, तर निफ्टी 72 अंकांच्या वाढीसह 22,492 अंकांच्या पातळीवर काम करत होता.

सेन्सेक्स-निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

BSE सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 27 शेअर्समध्ये चांगली वाढ होत आहे आणि फक्त 3 शेअर्स घसरत आहेत. सेन्सेक्सच्या मजबूत वाढीमध्ये बँकिंग शेअर्सचा मोठा वाटा आहे. त्याच वेळी, NSE निफ्टीच्या 40 शेअर्सपैकी 42 शेअर्स वाढत आहेत आणि 8 शेअर्स घसरत आहेत.

Share Market
Kotak Mahindra Bank : माहिती तंत्रज्ञानाच्या भस्मासुराचा बळी
Nifty Today
Nifty TodaySakal

टेक महिंद्रा 1.80 टक्के आणि आयसीआयसीआय बँक 1.75 टक्क्यांनी वर आहे. अल्ट्राटेक सिमेंट 1.27 टक्के, मारुती 1.26 टक्के वाढ दर्शवत आहे. इंडसइंड बँक 1.16 टक्के आणि एनटीपीसीचा शेअर 1.15 टक्क्यांनी वाढीसह व्यवहार करत आहे. घसरलेल्या शेअर्समध्ये, ITC, बजाज फिनसर्व्ह, M&M आणि HCL टेकच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे.

निफ्टीचे कोणते शेअर्स तेजीत?

बाजार उघडल्यानंतर निफ्टीच्या वाढत्या शेअर्समध्ये CICI बँक 1.75 टक्क्यांनी, IndusInd बँक 1.60 टक्क्यांनी, DV's Lab 1.45 टक्क्यांनी आणि मारुतीचे शेअर्स 1.11 टक्क्यांनी वर आहेत. घसरलेल्या शेअर्समध्ये 5.68 टक्के आणि एचसीएल टेक 4.66 टक्क्यांनी घसरला आहे. M&M 1.38 टक्क्यांच्या घसरणीने आणि श्रीराम फायनान्स 1.15 टक्क्यांनी घसरत आहे.

Share Market
Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''
S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

'या' कंपन्यांचे Q4FY24 निकाल आज जाहीर होतील

अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंट, केपीआयटी टेक्नॉलॉजीज, पूनावाला फिनकॉर्प, टाटा केमिकल्स, बिर्लासॉफ्ट, पीएनबी हाऊसिंग फायनान्स, केएफआयएन टेक्नॉलॉजीज, कॅन फिन होम्स, शॉपर्स स्टॉप, वेसुवियस इंडिया, स्पंदना स्फुर्टी फायनान्शिअल, रोसरी बायोटेक, यूको इंडिया आणि जीलेट या कंपन्यांचे Q4FY24 निकाल आज जाहीर होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com