police arrested
police arrested 
जळगाव

ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गटांचा वाद; आणखी दहा जणांना अटक 

सकाळवृत्तसेवा

मेहुणबारे (जळगाव) : लांबे वडगाव (ता. चाळीसगाव) येथे ग्रामपंचायत निवडणुकीतून दोन गटांत उफळलेल्या वादातून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या कोमलसिंग पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी दंगलीच्या गुन्ह्यानंतर मेहुणबारे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील मेहुणबारे पोलिसांनी फरार असलेल्या दहा संशयितांना अटक केली. या गुन्ह्यात आतापर्यंत १९ संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी दिली. 
अटक केलेल्या संशयितांमध्ये संतोष देवसिंग पाटील (राजपूत), योगेश मानसिंग पाटील, संजय देवसिंग पाटील, अमरसिंग मानसिंग पाटील, केतनसिंग भरतसिंग पाटील, सोमनाथ उर्फ लखनसिंग बालू पाटील, रवींद्र उर्फ कुणाल बिजेसिंग पाटील, बिजेसिंग वेडू पाटील, देवराज मंगलसिंग पाटील, मंगलसिंग देवसिंग पाटील, (सर्व रा. लांबे वडगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. संशयितांपैकी तीन फरारी झालेल्यांचा शोध पोलिस घेत आहेत. 

अन्‌ तलवारी, कोयते काढले
लांबेवडगाव (ता.चाळीसगाव) येथे 15 जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालानंतर दोन गटांमध्ये धुमश्चक्री उडाली.यात तलवारी,कोयते, लाठ्या काठ्या यांचा सर्रास वापर करण्यात आला. या हाणामारीत दोन्ही गटातील तीन जण गंभीर जखमी झाले.त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक होती. त्याचा धुळे येथे मृत्यु झाला होता. याप्रकरणी परस्परांच्या विरोधात मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्यात गुन्ह्यात 23 आरोपींपैकी यापूर्वी 9 जणांना अटक करण्यात आली होती तर अजुन 10 जणांना शुक्रवारी रात्री मेहूणबारे पोलीसांनी अटक केली.आज त्यांना चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT