crime
crime  
जळगाव

रस्‍त्‍यावरून येणारे जाणारे केवळ पाहत राहिले; कारण डोक्‍याला लावली बंदुक अन्‌ लुटले पंधरा लाख

राजेश सोनवणे

जळगाव : दुचाकीवरून १५ लाख रूपयांची कॅश घेऊन जाणाऱ्यांना दोघांनी बंदुकीचा धाक दाखवून रोकड लंपास केली. कॅश घेवून दोघेजण फरार झाल्याचा प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील रहदारीचा रस्‍ता असलेल्‍या पंचमुखी हनुमान मंदिराजवळील परिसरातून महेश चंद्रमोहन भावसार (वय ५३, रा. दिक्षीतवाडी) आणि संजय सुधाकर विभांडीक (वय ५१, रा. महाबळ कॉलनी) हे दुपारी सव्वाचारच्या सुमारास १५ लाख रूपयांची रोकड घेऊन जात होते. यातील महेश भावसार यांच्याकडे रोकड असून ते एका दुचाकीवर होते. तर विभांडीक हे त्यांच्यासोबत दुसऱ्या दुचाकीने जात होते. दोघेजण पंचमुखी हनुमान मंदिराजवळ आले असतांना त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी थांबवण्याचा प्रयत्न केला.

बॅग लांबविण्याचा प्रयत्‍न फसला अन्‌
एकाने महेश भावसार यांच्याजवळ असलेली पैसे असलेली बॅग लांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. यामुळे चोरट्याने सरळ बंदुक काढून त्यांना धमकावले. यात दोघांमध्ये झटापट देखील झाली.  यामध्ये रिव्हॉल्व्हरची मॅगेझीन खाली पडली. दरम्‍यान एकाने दुचाकीवरून पळ काढला. तर दुसरा पळत जाऊन घटनास्थळावरून फरार झाला. अवघ्या काही मिनिटांमध्ये हा थरार घडल्याने परिसरात खळबळ उडाली. 

सीसीटीव्ही तपासणीचे काम
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी खाली पडलेले मॅगेझीन जप्त करून चौकशीस सुरवात केली. भर दिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस आता परिसरातील सीसीटिव्हीमध्ये हे चोरटे दिसून येतील; या दृष्‍टीने तपास करत आहेत. यातील एका फुटेजमध्ये चोरट्याच्या शरीराचा खालील भाग आला असून तो वेगाने पळत असल्याचे दिसून आले आहे. यात रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावणाऱ्याने जीन्सची पँट आणि पांढरा शर्ट घातल्याची माहिती भावसार आणि विभांडीक यांनी पोलिसांना दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT