kidnaping case sakal
जळगाव

बहिण- भावाचे अपहरण करून लावले कामाला; मुलगी रडल्‍याने प्रकार उघड

बहिण- भावाचे अपहरण करून लावले कामाला; मुलगी रडल्‍याने प्रकार उघड

सकाळ डिजिटल टीम

जळगाच : परप्रांतीय कुटुंबांतील १० वर्षाची मुलगी व ९ वर्षांचा मुलगा अशा दोघा भाऊ- बहिणीचे अपहरण (Sister brother kidnaping case) झाल्याची घटना २७ मे रोजी घडली होती. शनिपेठ पोलीस ठाण्यात या सुनील पडत्या बारेला (रा. चिरमलीया जि. बडवानी, मध्यप्रदेश) याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही बालके अमळनेरात सुखरुप सापडली असून संशयितांसह दोन्ही बालकांना पकडून अमळनेर पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी शनिपेठ पोलिसांचे (Jalgaon police) पथक रवाना झाले आहे. (jalgaon-news-sister-and-brother-kidnaping-work-in-constraction-amalner)

काय होती घटना

पिडीत बालकांचे कुटुंबिय हे मूळ मध्यप्रदेशातील असून रोजगार निमित्ताने शहरातील गोपाळपूरा येथे वास्तव्यास आहेत. या कुटुंबाच्या ओळखीतील सुनील पडत्या बारेला हा तरुण २७ मे रोजी गोपाळपूरा येथे बालकांच्या घरी आला. खाऊ घेण्यासाठी देाघा भावंडाना सोबत घेवून सुनील घराबाहेर पडला. यानंतर सुनील घरी परतला. मात्र, त्याच्यासोबत घेवून गेलेली दोन्ही बालके आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर दोन्ही मुले मिळून न आल्याने शनिपेठ पोलीस ठाण्यात पालकांनी तक्रार दिली होती.

मुलगी रडली आणि..

दोन्ही बालकांचे एकाचवेळी अपहरण झाल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली. उपनिरिक्षक अमोल कवडे, गणेश गव्हाळे, विजय निकम, अनिल कांबळे, भावेश कोठावदे यांचे पथक गेल्या पाच दिवसांपासून मध्यप्रदेशातील बडवानी, चिरमलीया, शिंदवाड यासह चोपडा तालुक्यातील वैजापूर, जुनापाणी यासह डोंगराळ भागात संशयितासह चिमुकल्यांचा शोध घेत होते. अमळनेर येथील एका बांधकामावर ही अल्पवयीन मुल काम करत होती. मुलगी रडायला लागल्याने संशय येवून येथील मजुरांनी चौकशी केल्यानंतर प्रकार उघडकीस आला. यानंतर संशयित सुनील बारेला याच्यासह दोन्ही मुलांना अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT