jadutona
jadutona 
जळगाव

आजार दूर करण्यासाठी केले कुंकवाचे पाणी, त्‍यात टाकली पोत पण..काय होता नेमका प्रकार

दीपक कच्छवा

मेहुणबारे (जळगाव) : जादूटोण्याच्या नावाखाली घरात प्रवेश करून पत्नीचा आजार बरा करण्याचे सांगून औषधी, तसेच कुंडली काढण्याच्या बहाण्याने एक लाख १५ हजार २०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा करणाऱ्या जामनेर तालुक्यातील येथील दोघा भामट्यांना मेहुणबारे पोलिसांनी केवळ मोबाईलच्या लोकेशनवरून अटक केली. विजय शालिकराम जोशी व दिगंबर जोशी अशी अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत. 

लोंढे (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी जितेंद्र भोसले यांच्या पत्नीला चार वर्षांपासून संधिवाताचा त्रास आहे. विविध उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यातच भोसले ३० मार्चला सकाळी नऊच्या सुमारास कुटुंबासह घरात असताना दोन व्यक्ती आले. आपण जोशी ब्राह्मण असल्याचे सांगत तुमच्या घराची दशा आम्हाला बरोबर दिसत नसून तुम्हाला काही पूजा करावयाची असेल, तर आम्ही करून देऊ, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना घरात बोलावले. 

करणी केल्याचे सांगितले 
घरात येताच दोघांनी घराच्या सर्व दिशांना पाहून तुमच्या घरात दोष असून, कोणीतरी करणी केली आहे, असे सांगितले. श्री. भोसले यांच्या पत्नीने त्यांना मुलांबाबत विचारले असता दोन्ही मुलांच्या नवीन कुंडल्या काढून देतो, असे सांगितले. तसेच पत्नीच्या संधिवातावरही औषध असून, तीन दिवसांत आजार पूर्ण बरा करून देण्याचे आश्वासन दिले. कुंडली काढण्याचे दोनशे रुपये तसेच संधिवाताच्या औषधाचे चार हजार रुपये असे चार हजार २०० रुपये त्यांनी उकळले. जाताना व्हॉट्सॲप क्रमांकही दिले. 

भूतबाधा उतरविण्याचा सल्ला 
दोघे भामटे १, ५ व ६ एप्रिलला पुन्हा श्री. भोसले यांच्या घरी आले व त्यांनी देव्हाऱ्याजवळ पत्नीची मंत्रतंत्र म्हणून पूजा केली. तुम्हाला भूतबाधा झाली असून, उतरवयाची असेल, तर २१ हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. मात्र, एवढे पैसे देण्यासाठी नाही, असे सांगितल्यावर तडजोड करून एक हजार रुपयांत पूजा करण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एक हजार रुपये त्यांना दिले. 

भामट्यांची हातचलाखी 
दोघे भामटे गुरुवारी (ता. ८) सकाळी दहाला पुन्हा घरी आले. भोसले यांच्या पत्नीव्यतिरिक्त घरातील सर्व लोकांना घराबाहेर काढून देव्हाऱ्याजवळ जाऊन त्यातील एकाने भोसले यांच्या पत्नीची पूजा केली. तर दुसऱ्या जोशीने एका वाटीत कुंकवाचे पाणी केले व त्यात लिंबू पिळून भोसले यांच्या पत्नीचे १३ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत कुंकवाच्या पाण्यात टाकली. त्यावर ताटली ठेवून ती देव्हाऱ्याखाली ठेवली. सायंकाळपर्यंत देव्हाऱ्याखाली ठेवलेल्या वाटीतील पाणी पिवळे होईल व लिंबू लाल रंगाचे होईल. त्यानंतर तुम्ही सोन्याची माळ काढून घ्या, असे सांगत हे दोघे निघून गेले. सायंकाळी देव्हाऱ्याखाली ठेवलेली वाटी बाहेर काढली असता त्यात सोन्याची मंगलपोत नसल्याचे लक्षात आले. दोघा भामट्यांनी जादूटोणा करून फसवणूक करून ६० हजारांची १३ ग्रॅमची सोन्याची पोत व घरातील डब्यात ठेवलेले ५० हजार रुपयेही दिसून आले नाहीत. याप्रकरणी जितेंद्र भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे तपास करीत आहेत. 

मुलीची समयसूचकता 
भोसले यांच्या मुलीने समयसूचकता दाखवत मैत्रिणीच्या मोबाईलवरून त्या भामट्यांच्या मोबाईलवर संपर्क केला व आम्हालाही पूजा करावयाची असल्याचे सांगितले. त्यांचा मोबाईल सुरू असल्याने श्री. देसले व श्री. शिंदे यांनी दोघा भामट्यांचे मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले. ते पहूर (ता. जामनेर) येथे असल्याची माहिती मिळाली. मेहुणबारे पोलिसांनी विनाविलंब पहूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली व पहूर पोलिसांच्या मदतीने दोघांना अटक केली. 

संपादन- राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT