जळगाव

अमळनेर औद्योगिक वसाहत विस्तारासाठी केंद्रीय मंत्र्याला साकडे

शासकीय जागेवर लहान-मोठे सर्व ७५ उद्योग कार्यरत होऊन अनेक कामगारांना रोजगार उपलब्ध झालेल्या आहे

उमेश काटे

अमळनेरः मंगरूळ (ता अमळनेर) येथील औद्योगिक वसाहतीच्या (Industrial Estate) विस्तारीकरण व वाढीसाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन (Government) स्तरावरून निधी मिळण्यासाठी ॲड.ललिता पाटील व बाजार समिती संचालक पराग पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची (Union Minister Narayan Rane) भेट घेऊन साकडे घातले.

अमळनेर सहकारी औद्योगिक

वसाहतीची स्थापना चेअरमन जगदीश चौधरी व त्यांचे सहकारी संचालक मंडळ यांच्या मागणी नुसार करण्यात आली. शासकीय जमिनीवर उद्योगासाठी १९८० मध्ये प्लॉट वितरित झालेले आहेत. सदर शासकीय जागेवर लहान-मोठे सर्व ७५ उद्योग कार्यरत होऊन अनेक कामगारांना रोजगार उपलब्ध झालेल्या आहे. संस्थेला कुठल्याही प्रकारचे उत्पादन नसल्यामुळे उद्योगासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा रस्ते, लाईट, पाणीपुरवठा, ड्रेनेज इत्यादी सुविधा पुरवण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत. केंद्रशासनाने कोरोना काळ असतानाही MSME सेक्टर साठी दिलेल्या मदतीचा हात व शासकीय धोरणास अनुसरून कोरोना काळातही उद्योजकांनी आपले उद्योग चालवून कामगारांना सतत रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे.

परंतु उद्योजकांना मूलभूत सुविधा नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उद्योगासाठी लागणारे मूलभूत सुविधां उपलब्ध न झाल्यामुळे या वसाहतीतील उद्योगाचा विकास खुंटलेला आहे. म्हणूनच सहकारी संस्थेतर्फे विनंती की उद्योगाचा विस्तार व वाढ करण्यासाठी केंद्र शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी व मूलभूत सुविधां मिळाव्यात अशी विनंती ॲड.ललिता पाटील , बाजार समिती संचालक पराग पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT