Village Water supply 
जळगाव

गावात पाणी टंचाई..तरी स्वखर्चाने भागवतोय गावकऱ्यांची तहान!

Jalgaon Drought News : सर्वत्र पाणी नसल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे, पिके कोमेजली आहेत.

प्रा. हिरालाल पाटील

कळमसरे ता.अमळनेर ः यावर्षी जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) ऑगस्ट महिना अर्धा झाला तरीही पाऊस (Rain) नसल्याने विहिरींनी (Wells) तळ गाठला आहे. परिणामी सर्वत्र पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती झाली आहे. वासरे (ता.अमळनेर) येथील गावातही गावाला पाणी पुरवठा (Water supply) करणारी विहिरीने तळ गाठल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. यापार्श्वभूमीवर येथील शेतकरी राजेंद्र शेनपडु पाटील हे स्वताच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने स्वखर्चाने गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून करीत आहे.

Village Water supply

येथील गावात पाणी टंचाई जाणवू लागल्याने राजेंद्र पाटील यांनी कळमसरे येथील जय बाबारी भक्त परिवाराचे पाण्याचे टँकर मागवून त्याला स्वमालकीचे ट्रॅक्टर जोडून स्वताच्या मालकीची विहिरीतून गावातील प्रत्येक गल्लीत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे तात्पुरती का असेना पिण्याच्या पाण्याची सोय होत असल्याने वासरेकरांना दिलासा मिळत आहे. यामुळे राजेंद्र पाटील यांचे कौतुक होत असून दुष्काळात वासरेचा भगीरथ भागवतोय गावकऱ्यांची तहान असेही गौरव उदगार निघत असल्याने त्यांच्यावर या नित्याच्या उपक्रमामुळे गावासह परिसरातुन कौतुकाची थाप उमटत आहे.

Village Water supply

असा केला जातो पाणी पुरवठा

राजेंद्र पाटील यांची खेडी रस्त्यावर स्वमालकीची शेती क्षेत्रात विहीर आहे.त्यांनी शेतात बागायती क्षेत्र कमी करून गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने दररोज शेतात जाऊन स्वखर्चाने टँकर भरून आणणे आणि गल्लीत उभे करून नळीच्या साहाय्याने प्रत्येक कुटुंबाला पिण्यासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून देणे.यामुळे मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून गावातील प्रत्येक गल्लीत यथावकाश पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वत्र पाणी नसल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके कोमेजली आहेत. मात्र अशाही परिस्थितीत राजेंद्र पाटील गावात टँकरने पाणी पुरवठा करीत असल्याने त्यांच्या या उदात्त हेतूने सामाजिक बांधिलकी जोपासल्याने गावातील महिला ,ग्रामस्थ यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक ही करीत आहेत.

यावर्षी गेले अडिच महिने उलटूनही पाऊस नसल्याने गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यात सर्वत्र दुष्काळ ग्रस्त परिस्थिती असताना राजेंद्र पाटील यांनी गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे.यामुळे ग्रामस्थना दिलासा मिळाला आहे.

-दीपक पांडुरंग पाटील ( वासरे ग्रामस्थ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT