जळगाव

कलियुगातील आधुनिक श्रावण बाळाचा असाही शेवट 

उमेश काटे

अमळनेर : रामायणात ज्या पद्धतीने श्रावण बाळाने वृद्ध मातापित्यांची सेवा केली. त्यांची तहान भागवण्यासाठी आपला जीवही गमावला होता. याच आदर्श पुत्राचा वारसा टिकवत येथील कलियुगातील आधुनिक श्रावण बाळाने आपल्या वृद्ध कोरोना ग्रस्त मातापित्यांची सेवा करून त्या दोघांना "कोरोना मुक्त" केले खरे, मात्र स्वतः कोरोना ग्रस्त झाल्याने उपचार घेत होता. मात्र क्रूर नियतीला वेगळेच मान्य होते. क्रूर काळाने त्यांचा प्राण घेऊन या कहाणीचा अंत केला. प्रवीण सुखदेव भालेराव (वय-36) असे त्या आधुनिक श्रावण बाळाचे नाव आहे. 

येथील तांबेपुरा भागात निवृत्त प्राथमिक शिक्षक सुखदेव भालेराव (वय 72) व पुष्‍पाबाई भालेराव (वय 65) हे वृद्ध दाम्पत्य राहतात. त्यांना दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे. दोन्ही मुले कामानिमित्त सुरत येथे वास्तव्यास आहेत. मोठे चिरंजीव प्रवीण भालेराव (वय- 36) हे सुरत येथे आपली उपजीविका भागवत वृद्ध आई-वडिलांना पैसेही पाठवीत होते. सर्व काही चांगले सुरू असताना कोरोना महामारी ने त्यांच्या जीवनात मोठे संकट आणले. वडील सुखदेव भालेराव यांना सुरुवातीला त्यानंतर आई पुष्‍पाबाई भालेराव यांनाही कोरोनाने ग्रासले. दोघांची सेवा करण्यासाठी प्रवीण भालेराव हे सुरतहून अमळनेरला धावत आले. त्यांनी या वृद्ध कोरोना ग्रस्त माता-पित्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आपला जीव धोक्यात घालून ते वृद्ध मातापित्यांची नियमित सेवा करत होते. ही सेवा पाहून शेजारील रुग्णांनाही त्यांचे हे कृत्य हायसे वाटायचे. "धन्य ते माता-पिता, धन्य तो पुत्र" असा आशीर्वाद द्यायचे. त्यांचा शुभाशीर्वाद व पुत्र सेवेमुळे हे वृद्ध दाम्पत्य अखेर कोरोनामुक्त होऊन घरी पोहोचले. मात्र यादरम्यान नियतीने प्रवीण भालेराव (वय 37) यांच्या जीवनात वेगळेच वाढून ठेवले होते. प्रवीण यांना पुन्हा कोरोनाने आपल्या जाळ्यात अडकवले. त्यांनाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दहा दिवसापासून ते कोरोना ला हरविण्यासाठी एकाकी झुंज देत होते.

या दरम्यान त्यांना रेमडीसीव्हर इंजेक्शन ची गरज होती म्हणून गोविंदा बाविस्कर यांच्यासह काही मित्रांनी त्यांच्यासाठी रेमडीसीव्हर इंजेक्शन मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केला, मात्र शहरात इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने गरजू रुग्णांना ते मिळत नाही याची प्रचिती त्यांना आली. अखेर हे इंजेक्शन न मिळाल्यामुळे प्रवीण भालेराव यांची प्राणज्योत काल रात्री दोन वाजता मालवली. एकीकडे सेवा करून या आधुनिक श्रावण बाळाने वृद्ध माता-पित्यांना कोरोनामुक्त केले, मात्र दुसरीकडे नियतीने चार वर्षाची मुलगी व 7 वर्षाच्या मुलापासून आपला वडील हिरावून नेला. काळ किती कठोर असतो याची प्रत्यक्ष प्रचिती भालेराव परिवाराला आली. प्रवीण यांच्यावर आज सकाळी दहा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

प्रशासनाने अधिक जागृत व्हावे 

सद्यस्थितीमध्ये शहरात रेमडीसीव्हर इंजेक्शन तुटवडा भासत आहे. हा कृत्रिम तुटवडा आहे अशी ओरड होत आहे. सद्यस्थितीत हे इंजेक्शन ब्लॅक मध्ये 3400 रुपये पर्यंत मिळत आहे. यावर तरी प्रशासनाने अंकुश आणावा. एक इंजेक्शन न मिळाल्यामुळे आज एका रुग्णाचा जीव गेला, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. किमान आता तरी कोणाचा जीव जाणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून गरजू रुग्णांना रेमडीसीव्हर इंजेक्शन तसेच ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: पाऊस थांबायचं नाव नाही! पुण्यात दरड कोसळली, नाशिकला ढगफुटीचा इशारा अन्...; आज कुठे काय घडलं? वाचा संपूर्ण अपडेट

IND vs ENG, 3rd T20I : भारताविरुद्ध आघाडी घेण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज! सामन्यासाठी यजमानांची Playing XI जाहीर

11th Special Round Extended: अतिवृष्टीचा फटका: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीची मुदत बुधवारीपर्यंत वाढ, सुधारित वेळापत्रक जाहीर

Pune Heavy Rain Alert: कर्जत घाटात दरडींचा तडाखा; मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प, १६ गाड्या रद्द

U19 IND vs SL : ९ चौकार अन् १ षटकार... द्रविडच्या लेकाची जोरदार फटकेबाजी; पण श्रीलंकेने सामना जिंकत केली ODI मालिकेत बरोबरी

SCROLL FOR NEXT