Crime 
जळगाव

पिस्तूल, चाकूच्या धाकावर रोमिओचा मुलीच्या घरासमोर धिंगाणा

मुलीसोबत लग्न करण्याच्या हेतूने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील तरुणीशी जबरजस्तीने लग्न (married) लावून देण्यासाठी मुलीच्या घरासमोर पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर दहशत घालण्याचा प्रकार रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. याबाबत दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शहरातील खडका रोड भागातील पटेल कॉलनीतील आरिफ भाईसाहब पटेल (वय ४९) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी आशिक असलम बेग उर्फ बाबा काल्या (रा. अयान कॉलनी) व त्याचा साथीदार (नाव माहित नाही) यांनी १९ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पटेल कॉलनीत पटेल यांच्या घरासमोर त्यांच्या मुलीसोबत लग्न करण्याच्या हेतूने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी बाबा काल्यासोबत असलेल्या त्याच्या साथीदाराने घरातील लोखंडी दरवाजावर फर्शीचे तुकडे फेकून दरवाजाचा कडी-कोयंडा तोडला तर बाबा काल्याने हातात पिस्तूल घेऊन तर त्याच्या साथीदाराने हातात चाकू घेऊन आरडाओरड करून दहशत निर्माण केली.

याबाबत घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तसेच मुलीच्या वडिलांना धीर दिला. बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला हे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT