crime
crime crime
जळगाव

मित्राचा खुन करून खड्यात झाकला..आणि पोलिसांकडे स्वःताहून गेला

सकाळ वृत्तसेवा



भुसावळ : शहरातील लिंपस क्लब (Limpus Club) भागातील खुनाची घटना ताजी असताना शनिवारी (ता. ८) पुन्हा तरुणाचा खून (murder) झाल्याची घटना आगवली चाळ परिसरात उघडकीस आली. सुनील अरुण इंगळे (वय २७) असे मृताचे नाव आहे. जुन्या वादातून (argument) मित्रानेच (fraind) हत्या केली असून, शनिवारी सकाळी संशयिताने स्वतःहून पोलिस ठाण्यात ( bhusawal police Station) जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे.


( bhusawal city old argument ended fraind friends life hit )

भुसावळ शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असून, त्यात खुनाच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील पंजाबी मशिद परिसर, आगवाली चाळ परिसरात सुनील अरुण इंगळे (वय २७) व संशयित शाबाज शहा (वय २२, भुसावळ) यांच्यात कुठल्यातरी जुन्या वादातून शुक्रवारी (ता. ७) मध्यरात्री भांडण झाले. वादावादीनंतर संशयित शाबाज याने सुनील इंगळे याच्या पोटात चाकूचे सपासप वार केल्याने सुनीलचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री उशिरा ही घटना घडल्यानंतर संशयिताने मृतदेह एका खड्ड्यात टाकून त्यावर सिमेंट पत्र्यांनी झाकले व दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःच शहर पोलिस ठाण्यात जाऊन खून केल्याची कबुली दिल्याने पोलिसही अवाक् झाले. पोलिसांनी लागलीच घटनास्थळाची जाऊन पाहणी केली असता त्यांना मृतदेह आढळून आला.


अपर पोलिस अधीक्षकानी केली पाहणी
शनिवारी (ता. ८) दुपारी बाराच्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली. याची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून जळगाव येथून आलेल्या तज्ज्ञांनी घटनास्थळी पडलेल्या दगडावरील नमुने गोळा केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


लागोपाठ दुसरी खुनाची घटना

मागील महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवशी याच परिसराला लागून असलेल्या लिंपस क्लबजवळ संदीप गायकवाड (वय ३४, रा. समतानगर, ध्यान केंद्राजवळ) या तरुणाची त्याच्याच मित्रांनी आपसातील किरकोळ वादामुळे दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. तर आज पुन्हा मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याची लागोपाठ दुसरी घटना घडली आहे.

( bhusawal city old argument ended fraind friends life hit )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT