photo grapher
photo grapher 
जळगाव

फोटोग्राफरच्या जीवनात मिरच्यांनी आणला गोडवा ! 

श्रीकांत जोशी

भुसावळ : कोरोनाचा परिणाम फोटोग्राफी व्यवसायावर झाला असून त्यांनी लाल मिरच्या विकणे, घराला रंगरंगोटी करून देणे अशी कामे सुरू केली आहेत. मिरची विक्रीतून चांगला फायदा झाल्याचे फोटोग्राफर मुकेश नेवे सांगतात. 

लॉकडाउन मध्ये लग्न व इतर कोणतेच समारंभ नसल्याने फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंग व्यवसायावर त्याचा परिणाम झाला. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती त्यांनी पर्यायी व्यवसाय सुरू केला. फोटोग्राफर मुकेश नेवे सांगतात मी गेल्या वीस वर्षांपासून या व्यवसायात आहे. लॉकडाउनमुळे आमच्या व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला. दुसरा व्यवसाय सुरू करणे आवश्‍यक होते. मुळात मला बिझनेसची आवड होतीच. काकांची पूजेचे साहित्य विक्रीचे दुकान आहे. मी देखील नवरात्र व गणेश उत्सवात पूजेचे साहित्य विक्री करायचो. लॉकडाउन काळात मंदिरे बंद असल्याने पूजा साहित्य विकणे शक्‍य नव्हते. एका खेडेगावात तिखट तयार करण्यासाठी घेतल्या लाल मिरच्या विकल्या जात असल्याचे पाहिले. तेव्हा हाच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आत्येभाऊ नीलेश नेवे यांचा लग्नात फेटे बांधण्याचा व रांगोळी काढण्याचा व्यवसाय होता. आम्ही दोघांनी मिळून मिरच्या विकल्या. मित्राची देखील साथ मिळाली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चपाटा, रसगुल्ला व गावराणी आदी प्रकारच्या पंधरा पोते लाल मिरच्या विकल्या. आता लग्नाच्या ऑर्डर मिळत आहे. पण मर्यादित उपस्थितीमुळे फोटो कमी काढले जातात. त्यामुळे परवडत नाही असे नेवे म्हणाले. 
फोटोग्राफर राजू भारुडे म्हणाले मी गेल्या आठ वर्षांपासून भुसावळ मध्ये फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंग करीत आहे. त्याआधी सातवर्ष मुंबईला चित्रपट व भाविकांना स्पेशल इफेक्‍ट देण्यासाठीच्या कंपनीत काम करत होतो. वर्षभरापूर्वी जागा भाड्याने घेऊन स्टुडिओ सुरू केला. लॉकडाउनमुळे स्टुडिओ बंद होता. जागेचे भाडे देणे परवडत नव्हते. त्यामुळे जागा मालकाला परत केली. नंतर मित्रांसोबत मिरच्या, धणे, भाजीपाला विकला. आता घराच्या रंगरंगोटीचे काम मिळाले आहे. माझ्या सोबतीला आणखी चार माणसे काम करतात. असे भारुडे म्हणाले. 

मुंबईला काम करताना सततच्या फास्टफुडमुळे अल्सरचा त्रास सुरू झाला. त्यामुळे गावी परत यावे लागले. मात्र माझ्यातील कलेने मला कधीच भुके राहू दिले नाही. फोटोग्राफी चांगली चालली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संकट आले असतानाच पुन्हा कलाच मदतीला आली. घरांच्या रंगरंगोटीचे काम मिळाले. हे काम मी नववीत असताना आधी केले होते. 
-राजू भारुडे, फोटोग्राफर, भुसावळ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT