भुसावळ : माजी खासदार व भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांचे आज कोरोना संसर्गामुळे मुंबई येथे निधन झाले. कोरोना असल्याने त्यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला. अंत्यदर्शनासाठी त्यांच्या आई व पत्नीला देखील जाता आले नाही. यामुळे दोघांनीही व्हिडिओ कॉलव्दारे अंतिम दर्शन घेतले.
माजी खासदार हरिभाऊ जावळे हे मुळ भालोद (ता.यावल) येथील रहिवासी आहेत. कोरोना संसर्ग झाल्याने ते मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होते. उपचारादरम्यान त्यांचा आज निधन झाले. निधनानंतर त्यांच्यावर मुंबईतच अंत्यविधी करण्याचे ठरले. रात्री आठ वाजता मुंबईच्या विद्युत दाहिनीत अंत्यविधी पार पडला. यावेळी जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे, जावाई स्नेहल पाटील व आरोग्यदुत रामेश्वर नाईक असे तिघेजण उपस्थित होते.
पत्नी- आईला नाही परवानगी
भालोद येथे असलेल्या जावळे यांच्या मातोश्री सुमनबाई जावळे, पत्नी कल्पना जावळे यांना मुंबईला जाण्यास परवानगी नव्हती. मुळात कोरोना पॉझिटीव्ह असल्याने अंत्ययात्रेला जाण्यास परवानगी नव्हती. यामुळे आई आणि पत्नीला अंत्यदर्शन घेता यावे म्हणून रामेश्वर नाईक यांनी व्हॉटसऍपवर व्हिडिओ कॉल लावला होता. हा कॉल जावळे यांचे माजी जनसंपर्क अधिकारी संदिप पाटील यांनी टि.व्ही.ला कनेक्ट करुन दिल्याने इतरांनाही अंतिम दर्शन घेता आले. यावेळी जावळे यांची लहान मुलगी हिमाली चौधरी व जावई आश्लेश चौधरी भालोदला आले होते. त्यांनीही अंत्यदर्शन व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.