shiv sena
shiv sena 
जळगाव

रेल्वे उड्डाणपुलाचे काम शिवसेनेने पाडले बंद 

सकाळ वृत्तसेवा

बोदवड : ठेकेदाराकडून कामगार कायद्याचे उल्लंघन होत असल्याने शिवसेनेने रविवारी (ता. १२) नाडगाव रेल्वे उड्डाणपुलाचे काम बंद पाडले. कामगार कायद्याचे पालन व्हावे, यासाठी शिवसेनेच्या नाडगाव, नांदगाव शाखेने गौण खनिज वाहतूक होत असलेल्या ठिकाणांवर डंपरसमोर दुचाकी आडवी लावून काम बंद पाडले. उड्डाणपुलावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मास्क व सॅनिटायझर नसल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण प्रतिबंधात्मक कायद्याचे उल्लंघन होत असल्याने तलाठी कल्पना पागृत यांनी पंचनामा केला. 
उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी बोदवडच्या तहसीलदारांनी गौण खनिज वाहतुकीसाठी रॉयल्टी दिली आहे. कंत्राटदाराने नियोजित खदानीतून उड्डाणपूल बांधकाम परिसरात गौण खनिजाचा साठा केला आहे. याच साठ्यावरून नेहमीप्रमाणे कामे सुरू असलेल्या ठिकाणी गौण खनिज वाहतूक सुरू आहे. याबाबत तहसीलदारांना हा प्रकार कळविला असता, त्यांनी गौण खनिज वाहतुकीचे काम खदानीवरून सुरू नसून ते उड्डाणपुलाजवळून सुरू आहे व त्यांचे पिचिंगचे काम सुरू असल्याची उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून पुन्हा एकदा कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे काम तहसीलदार हेमंत पाटील यांनी केले. 

रविवारीही गौण खनिज वाहतूक 
या ठिकाणी नांदगावच्या तलाठ्यांनी पाहणी करत सकाळी अकराच्या सुमारास पंचनामा केला. तहसीलदारांच्या आदेशात रविवारी गौण खनिज वाहतुकीला मज्जाव केला आहे. उड्डाणपूल परिसरात जेसीबीच्या सहाय्याने डंपरवरून गौण खनिज वाहतूक सुरू होती. वाहनचालकांच्या तोंडाला मास्क नव्हते. संबंधित ठिकाणाहून नियोजित ठिकाणी गौण खनिज वाहतुकीचे काम सुरू होते. तहसीलदारांच्या आदेशपत्रात नमूद वाहन क्रमांकाव्यतिरिक्त वाहने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे तलाठ्यांच्या पंचनाम्यात नमूद आहे. 

कामगार आयुक्तांकडे तक्रार 
कंत्राटदाराकडून कामगारांची पिळवणूक होत असल्याची लेखी तक्रार नाडगाव शिवसेना शाखेने कामगार आयुक्तांकडे केली आहे. त्यात म्हटले आहे, की कामगार कायदा धाब्यावर बसविला जात आहे. साप्ताहिक सुटी देणे गरजेचे असताना रविवारी कामगारांकडून कामे करून घेतली जात आहेत. कामगारांना सकाळी चहा, अल्पोपाहार व जेवण देणे गरजेचे आहे. उड्डाणपुलाच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार आहे. कामबंद आंदोलनात युवासेनेचे तालुका समन्वयक अमोल व्यवहारे, अर्जुन आसणे, गणेश राजपूत, संजय सोनवणे, सागर सुल्ताने, रवींद्र नखोद आदी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT