girna river
girna river 
जळगाव

गिरणाला प्रथमच मोठा पुर; गावांना दिला इशारा

दीपक कच्छवा

मेहुणबारे (जळगाव) : गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्री मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठी आवक सुरु आहे. यामुळे गिरणा नदीत पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठालगत असलेल्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गिरणा धरणातून आज सकाळी (ता. २०) ८.४० वाजता गिरणा धरणाचा प्रवाह ६६ हजार ८५३.६२ क्युसेसवरुन ७४ हजार २८२ व मन्याड धरणातून ७ हजार ५०० असा तब्बल ८१ हजार ७८२ क्युसेसने गिरणा पात्रात पाणी सुरु असल्याने गिरणा नदीला पुर आला आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. गिरणा धरणातून ७४ हजार २८२ व मन्याड धरणातून ७ हजार ५०० असा पाण्याचा विसर्ग गिरणा पात्रात सुरु असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी सकाळशी बोलतांना सांगितले. 

नदीकाठच्‍या गावांना इशारा
गिरणा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.गिरणा नदीपात्रात पाण्याची वाढ होत आहे. नदी काठावरील गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी. नदी पात्रात कोणीही जावू नये, असेही आवाहन गिरणा पाटबंधारे विभागच्या सुत्रांनी केले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT