valu chori damper
valu chori damper 
जळगाव

चोरीची वाळू तलाठ्याने रोखली; मग डंपर घातले पेट्रोलपंपाच्या आवारात

दीपक कच्छवा

मेहुणबारे (जळगाव) : चाळीसगाव तालुक्यात वाळूचोर महसूल प्रशासनाला अजिबात जुमानत नसल्याचे चित्र आहे. आज सकाळी महसूल पथकाने ओझर (ता.चाळीसगाव) येथे जवळच अवैध वाळू वाहून नेणारे डंपर पकडले. मात्र डंपरमालकाने या पथकाशी अरेरावी करून डंपरमधील वाळू पेट्रोलपंपाच्या आवारातच खाली करून डंपर पळवून नेले. याप्रकरणी डंपर मालक व चालकाच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तहसीलदार यांच्या आदेशान्वये गौण खनिज वाहतुक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी चाळीसगाव सजा तलाठी विलास बाबुलाल शेळके, सांगवी तलाठी दीपक गोविंदा गुरव, हातले भाग मंडळ अधिकारी सचिन मानसिंग मोरे यांचे पथक आज (ता.३) सकाळी वाघळी रोडने जात असतांना ओझर गावाजवळ मंडाई पेट्रोलपंपासमोर भडगावरोडकडून पांढऱ्या व निळ्या रंगाचे हायवा डंपर क्र.एमएच.२० डीई.३३१९ हे चाळीसगावकडे येतांना दिसले. 

त्‍याने पेट्रोलपंप आवारातच ओतली वाळू
पथकाने डंपरचालकाला थांबवून डंपरमधील वाळू परवान्याबाबत विचारणा केली. चालकाने परवाना नसल्याने सांगत माझे मालक येत आहेत, त्यांना विचारा असे सांगितले. त्‍याच वेळी गणेश पाटील (देवळी, ता. चाळीसगाव) हा इसम तेथे आला व चालकास डंपर पेट्रोलपंपाजवळच खाली करून पळून जाण्याबाबत सांगितले. चालकाने डंपर हायड्रोलीक करून चोरी करून आणलेली वाळू पेट्रोलपंप आवारात खाली करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडून जे होईल ते करा, माझे काहीही वाकडे होणार नाही असे सांगून डंपरमधील वाळू खाली करून चालकाने भडगाव रोडच्या दिशेने पळ काढला. 

पथकाशी अरेरावी
पथकाने डंपर मालक गणेश पाटील यास नाव गाव माहिती विचारून डंपर पळवून जाण्यास का सांगितले असे विचारले असता त्याने पथकासोबत अरेरावीची भाषा करून हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणला. पथकाने ही माहिती तहसीलदार यांना दिली. त्यांच्या आदेशानंतर तलाठी विजय शेळके यांच्या फिर्यादीवरून डंपर क्रमांक एमएच. २० डीई. ३३१९ चालक/मालक नाव गाव माहित नाही व गणेश पाटील रा. देवळी याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT