Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Uttarakhand Forest Fire Culprits: अशा प्रकारच्या व्हिडिओंद्वारे त्यांना सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी अधिक लाईक्स, व्हिव्ज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे.
Uttarakhand Forest Fire Culprits Viral Video
Uttarakhand Forest Fire Culprits Viral Videoesakal

आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात लोकं लाईक्स आणि व्हिव्ज मिळवण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा नेम राहिला नाही. कधी भर रस्त्यावर तर कधी भरगच्च रेल्वेमध्ये अनेक सोशल मीडिया तथाकथिक सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर नाचतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आसतात.

आता अशीच एक धक्कादायक घटना देहराडूनमधून समोर येत आहे. जी वाचल्यानंतर तुम्हीच म्हणाल, आता मात्र हद्द झाली.

कारण देहराडूनपासून 260 किलोमीटर अंतरावर असलेल्या चामोली पोलिसांनी बिहारमधील तिघांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी आरोप केला आहे की, सोशल मीडियावर लाईक्स आणि व्हिव्ज मिळवण्यासाठी या तिघांनी गैरसैन परिसरातील जंगलाला आग लावत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

दरम्यान या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून दखल घेत ही कारवाई केली. (uttarakhand forest fire culprits)

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीन तरुण जंगलात आग लावण्याचा प्रचार करताना दिसत आहेत. कथित व्हिडीओमध्ये एक तरुण असे म्हणताना ऐकू येत आहे की, "आगशी खेळणाऱ्यांना कोणीही आव्हान देत नाही... आणि बिहारींना कधीही आव्हान दिले जात नाही."

ब्रिजेश कुमार, सलमान आणि शुखलाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, ते तिघेही बिहारचे आहेत.

"त्यांच्यावर 1927 च्या भारतीय वन कायद्याच्या कलम 26 आणि भारतीय दंड संहितेच्या इतर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला," असे पोलिसांनी सांगितले.

Uttarakhand Forest Fire Culprits Viral Video
Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

ही घटना चमोलीच्या गैरसैन परिसरात घडली, असे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सर्वेश पनवार यांनी सांगितले.

जंगलात आग लावू नका किंवा त्यांना प्रोत्साहन देऊ नका, कारण हा दंडनीय गुन्हा आहे. जे कायद्याचे पालन करत नाहीत त्यांना शिक्षा केली जाईल," असे जिल्हा पोलीस अधीक्षक पुढे म्हणाले.

आदल्या दिवशी, उत्तराखंडचे पोलीस महासंचालक (डीजीपी), उत्तराखंड, अभिनव कुमार यांनी जाहीर केले की राज्याच्या जंगलातील आगीसंदर्भात नऊ जिल्ह्यांमध्ये अनेक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

Uttarakhand Forest Fire Culprits Viral Video
Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; पाहा व्हिडिओ

गैरसैन पोलीस ठाण्यातंर्गत पांडुखल गावातील व्हिडिओच्या आधारे, तीन आरोपींना अटक करण्यात आली. ब्रजेश कुणार, सुखलाल आणि सलमान हे सर्व बिहारचे रहिवासी आहेत, ते तेथे मजूर म्हणून काम करतात.

चौकशीदरम्यान या तिघांनी सांगितले की, त्यांना अशा प्रकारच्या व्हिडिओंद्वारे त्यांना सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी अधिक लाईक्स, व्हिव्ज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com