Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Harshit Rana KKR vs LSG
Harshit Rana KKR vs LSGesakal

Harshit Rana KKR vs LSG : कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा बीसीसीआयच्या मोठ्या कारवाईनंतरही सुधरलेला नाही असं दिसतंय. लखनौ सुपर जायंट्सविरूद्धच्या सामन्यात हर्षित राणानं विकेट घेतल्यावर ज्या प्रकारे सेलिब्रेशन केलं ते पाहता त्यानं बीसीसीआयची कारवाई गांभिऱ्याने घेतली आहे की नाही याबाबत साशंकता आहे.

Harshit Rana KKR vs LSG
MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

हर्षित राणावर बीसीसीआयने दोनवेळा कारवाई केली आहे. त्याने विकेट घेतल्यावर आक्रमकपणे सेलिब्रेशन केलं होतं. त्यामुळं त्याच्यावर दोनवेळा कारवाई करण्यात आली. त्यानं विकेट घेतल्यानंतर बाद झालेल्या फलंदाजाला फ्लाईंग किस दिला होता.

त्याची 100 टक्के सामन्याची फी दंड म्हणून कापून घेण्यात आली होती. याचबरोबर त्याच्यावर एका सामन्याची बंदी देखील घालण्यात आली होती. त्याने केकेआरविरूद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यादरम्यान ही कृती केली होती.

बीसीसीआयला पुन्हा डिवचलं

लखनौ सुपर जायंट्सविरूद्धच्या सामन्यात हर्षित राणानं विकेट घेतल्यावर आपली सेलिब्रेशन स्टाईल बदलली आता त्यानं फ्लाईंग किस देण्याऐवजी तोंडावर बोट ठेवत सेलिब्रेशन केलं. त्यामुळं चाहत्यांमध्ये तो विकेट घेतल्यावर सेलिब्रेशन करतोय की बीसीसीआयला डिवचतोय अशी चर्चा सुरू आहे. केकेआरने सोशल मीडियावर हर्षित राणाचा तोंडावर बोट ठेवत सेलिब्रेशन करतानाचा फोटो शेअर केला आहे.

Harshit Rana KKR vs LSG
IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

केकेआरने लखनौ सुपर जायंट्सचा 98 धावांनी मोठा पराभव केला. केकेआरच्या विजयात हर्षित राणाने देखील मोठा वाटा उचलला. त्याने तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. हर्षित राणाने केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिस यांची भागीदारी तोडली. त्यानंतर त्यानं दोन विकेट्स घेतल्या. हर्षित राणाने 3.1 षटकात 24 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. हर्षित राणाने यंदाच्या आयपीएल 2024 मध्ये 9 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com