जळगाव

उन्हाळी कांद्याच्या भावात घसरण, उत्पादक चिंतेत 

बालकृष्ण पाटील

गणपूर (ता चोपडा) : खानदेशात मोठ्या प्रमाणावर लागवड झालेल्या उन्हाळी कांद्याच्या काढणीला गेल्या पंधरा दिवसापासून सुरवात झाली असून हा हंगाम मध्यावर आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारावर झालेला परिणाम लक्षात घेता भावात घसरण झाल्याने उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

यावर्षी कधी नव्हे एव्हडी बियाणे टंचाई होती .त्यामुळे घरगुती बियाणे 1800 ते 2400 रूपये प्रतिकिलो तर कंपन्यांचे बियाणे 2200 ते 4400 रुपये किलोप्रमाणे विक्री झाले होते.मात्र एवढे महाग बियाणे घेऊनही शेवटी कांदा कमी दरात विकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. खानदेशात साक्री ,शेवाळे ,निजामपूर ,जैताने,फोफादे, दुसाने ,कढरे ,छडवेल,गोताने, लामकणी, चिंचवार, बोरिस ,सरवड ,शहादा ,गणपूर ,लासुर ,अडावद मंगरूळ,माचला ,वरडी ,चिंचोली ,किनगाव,नायगाव,चुंचाळे ,धरणगाव ,एरंडोल,गांधली ,पिळोदे ,आदी भागात कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

हंमागात कांद्याची घसरण

गेल्या पंधरवड्यात कांद्याचे जागेवरील भाव 300 ते 340 रुपये प्रति गोणी होते ते आज 250ते 300 रुपये झाले आहेत.एक महिन्यांपूर्वी 3 मार्च ला लासलगाव बाजारात उन्हाळ कांदा 1300 ते 2926 रुपये प्रतिक्विंटल होता तो आज700 ते 1101 रुपयांपर्यंत खाली आला असून आजची आवक 1800 क्विंटलची होती. ऐन हंगामात भावात घसरण झाल्याने खर्च निघणे कठीण झाले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सरकारचे संसदेत मोठं स्पष्टीकरण

Delhi Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवार गटाच्या आठ खासदारांशी भेट; मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा; राज्यात पावसाची शक्यता, पुढील ५ दिवसांचा अंदाज

Marathi News Live Updates: मुंबई आणि उपनगर परिसरात पहाटेपासून मुसळधार पाऊस, लोकल वाहतुकीला ब्रेक

Rahul Gandhi: संसदेत येण्याचे धैर्य शहांमध्ये नाही: राहुल गांधी, विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसची सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT