जळगाव

तीन दिवस उलटत नाही तोच वादळी पाऊस; संकटाची मालिका सुरूच शेतकरी खचला ! 

सुनील पाटील

चोपडा : वादळी वाऱ्याने तालुक्यातील पश्चिम भागातील घोडगाव, वाळकी, शेंदणी, मालखेडा, कुसुंबा, अनवर्दे बु. गणपूर, भवाळे, वढोदा या गावांतील केळी, पपई, मका, ज्वारी, कापूस या पिकाचे नुकसान केले होते. पुन्हा सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वारा व पावसाने अनवर्दे, मोहीदे, दगडी, वढोदा या गावातील केळी पिकाचे नुकसान केले आहे.

तीन दिवस उलटत नाही तोवर पुन्हा सोमवारी पश्चिम भागात वादळी पावसाने अनवर्दे, मोहीदे, वढोदा या गावातील केळी पिकाचे नुकसान केले आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास आलेले हे वादळ जवळपास अर्धातास चालले यामुळे रामकृष्ण मनोहर पाटील, अशोक जानकिराम पाटील, रमण डूमन पाटील, सुरेश देवराम पाटील, सोपान बाबुराव पाटील, राजाराम वासुदेव पाटील यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांचे ४० ते ५० हजार खोड जमिनीवर पडून पुर्णतः जमीनदोस्त झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  

पिके आली संकटात

वादळी पाऊस, अतिपावसामुळे यंदा पिकांवर विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात वादळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावलेला आहे. 
 

शेतकऱयांवर दुहेरी संकट 

यंदा पाऊस चांगला झाला असला तरी शेतकऱयांवरील संकट मात्र काही गेलेले नाही. अतिपावसामुळे पिके खराब झाली. तसेच पिकांवर विविध आजारांचा प्रादर्भाव पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कर्ज काढून शेती करणाऱया शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT