tharmal scrining
tharmal scrining 
जळगाव

पथक येणार थेट दारात...नागरीकांनी रहा सज्ज 

सकाळ वृत्तसेवा

एरंडोल : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका व ग्रामीण रुग्णालयातर्फे शहरातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. पालिका सभागृहात पालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर घेऊन तपासणीबाबत नियोजन करण्यात आले आहे. 
पालिका व ग्रामीण रूग्णालयाच्या या स्तूत्य उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी स्क्रीनिंगद्वारे करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत कोरोना कोरोना विषाणूंची कोणतेही लक्षण नसलेले नागरिक देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून शहरातील सर्व नागरिकांची इन्फ्रारेड थर्मामीटर व पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने स्क्रीनिंग करून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. शहरातील सर्व नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यासाठी पालिका कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व शिक्षक यांचे प्रभागनिहाय सात पथक स्थापन करण्यात आले आहेत. पथकातील सदस्यांनी तत्काळ कामास सुरुवात करण्याची सूचना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात पथकातील सदस्यांकडून स्क्रीनिंगचे काम सुरु करण्यात आले आहे. नागरिकांची माहिती एकत्रित करून ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येतील त्यांच्यावर तत्काळ एरंडोल येथील कोविड सेंटर येथे उपचार करण्यात येणार आहेत. आरोग्य तपासणी करतांना कुटुंबाची संपूर्ण माहिती घेण्यात येणार असून अकरा वर्षाखालील सदस्य व ५५ वर्षावरील सदस्य यांची विशेष माहिती घेण्यात येणार आहे. ताप, कोरडा खोकला, श्वसनास होणार त्रास आदी माहिती पथकातील सदस्यांकडून विचारण्यात येईल. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची इन्फ्रारेड थर्मामीटर द्वारे तपासणी करण्यात येईल. ज्या नागरिकांना कोरोनाविषयी कोणतेही लक्षण आढळल्यास पालिकेच्या टोल फ्री क्रमांक (१८००२३३५२५७) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. आरोग्य तपासणीसाठी सर्व नागरिकांनी पथकातील सदस्यांना सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याळे पालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विविध उपाय योजना सुरु केल्या आहेत. 

शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे शहरातील सर्व नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य तपासणीसाठी पालिका कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व शिक्षक यांचे पथक नियुक्त करण्यात आल आहे. नागरिकांनी मनात कोणतीही भिती न बाळगता आरोग्य तपासणी करून घ्यावी व पथकास सहकार्य करावे. 
- डॉ. फिरोज शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी, एरंडोल. 

शहरात कोरोनाचे रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वत:ची आरोग्य तपासणी करून सहकार्य करावे. प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. 
- किरण देशमुख (मुख्याधिकारी, एरंडोल) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT