crime 
जळगाव

धुळेः सापळा रचत पोलिस पथकाने संशयिताकडून पिस्तूल,काडतुसे जप्त

रोडलगत लक्ष्मीवाडीतील संशयित शुभम पुंड याच्याकडे गावठी पिस्तूल व काडतुसे असल्याची माहिती मिळाली.

सकाळ वृत्तसेवा



धुळे : शहरातील रेल्वे स्टेशन (Railway station) रोड भागातील लक्ष्मीवाडीत वास्तव्यास असलेला संशयित शुभम सुनील पुंड (वय २४) याला दसेरा मैदानाजवळ शहर पोलिस (Police) पथकाने पकडले. झडतीत त्याच्याकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तूल (Revolver) जप्त केली. संशयिताने पिस्तूल कुठून आणली याचा पोलिस शोध घेत आहेत.


जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी शहरासह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना अवैध शस्त्र बाळगत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईचा आदेश दिला आहे. त्यानुसार शहराचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना पूरक माहिती मिळाली. त्यात रेल्वे क्रॉसिंग जवळील शासकीय दूध डेअरी रोडलगत लक्ष्मीवाडीतील संशयित शुभम पुंड याच्याकडे गावठी पिस्तूल व काडतुसे असल्याची माहिती मिळाली.

त्यामुळे श्री. देशमुख यांनी पोलिस पथकाला संशयित शुभमला ताब्यात घेण्याची सूचना दिली. त्यानुसार दसेरा मैदानाजवळ सापळा रचत पोलिस पथकाने आशीर्वाद व्यापारी संकुलासमोर शुभमला पकडले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधीक्षक पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. देशमुख, कर्मचारी विलास भामरे, मुक्तार मन्सूरी, नीलेश पोतदार, प्रवीण पाटील, मनीष सोनगिरे, तुषार मोरे, शाकीर शेख, अविनाश कराड यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT