जळगाव

मालेगावच्या वीरूची पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी

दहिवद गावातील पाण्याच्या टाकीवर दुपारी तीनला एक जण चढला. प्रारंभी त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही.

सकाळ वृत्तसेवा


शिरपूर :
गाववालो... सुसाइड... म्हणणाऱ्या शोले चित्रपटातील वीरूची दहिवद (ता. शिरपूर) येथील ग्रामस्थांना तीव्र आठवण झाली. गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी देणाऱ्या अनिल साळुंखेचा अभिनयही अभिनेता धर्मेंद्रच्या तोडीचा होता. मात्र, त्याची मागणी पूर्ण करण्याऐवजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


दहिवद गावातील पाण्याच्या टाकीवर दुपारी तीनला एक जण चढला. प्रारंभी त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. नंतर त्याने आरडाओरडा करण्यास सुरवात केली. ‘मी उडी टाकसू... माले थांबाडानं नही...’, असे म्हणत आरोळ्या दिल्याने गर्दी जमली. गर्दीतील काहींनी तो अनिल अशोक साळुंखे असल्याचे ओळखले. त्याने खाली यावे, म्हणून मिनतवाऱ्या केल्या. मात्र, ‘त्याने वर कोणी आले, तर मी उडी टाकेन’, अशी धमकी दिली. घडल्या प्रकाराने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी सांगवी पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोचले.

लोखंडी जिन्यावरून ते वर जात असतानाच अनिल साळुंखे याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसल्यावर त्याने उडी टाकत असल्याचे भासविले. प्रत्यक्षात दोन्ही हातांनी टाकीचे लोखंडी कठडे घट्ट धरून ठेवले. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तेथे पोचून वेळीच त्याचे प्राण वाचविले. त्याची समजूत काढून खाली आणल्यावर मात्र अभिनयाबद्दलचे खास पोलिसी बक्षीस देण्यात आले. सायंकाळी सहापर्यंत हा प्रकार सुरू होता. अनिल साळुंखे देवघट (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील रहिवासी असून, महामार्गावरील एका हॉटेलवर कामास असल्याचे कळते. त्याने हा प्रयत्न का केला याबाबत माहिती मिळू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT