River Flood 
जळगाव

अंजनी धरण ओव्हर फ्लो..दोन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे नदी पात्रातील सर्व घाण वाहून जाण्यास मदत झाली असून पात्र स्वच्छ झाले आहे.

अल्हाद जोशी


एरंडोलः तालुक्यात दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे अंजनी प्रकल्प (Anjani Dam) पूर्ण क्षमतेने भरले असून आज सकाळी धरणाचे तीनही दरवाजे पंधरा सेंटीमीटरने उघडण्यात आले. प्रकल्पाच्या तिन्ही गेटमधून सुमारे दोन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग (Discharge of water) होत असून अंजनी नदीला पूर आला आहे. म्हसावद रस्त्यावरील मरिमाता मंदिराजवळील लहान पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दरम्यान सतत पडणाऱ्या पावासामुळे (Heavy Rain) खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी (Farmer Crisis) आर्थिक संकटात सापडले आहेत.



पळासदड (ता.एरंडोल) येथील अंजनी प्रकल्पाच्यावर असलेले सर्व चौदा बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तसेच अंजनी नदीच्या उगमस्थळ परिसरात दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे प्रकल्पातील जलसाठा सुमारे २२६ मीटर पर्यंत वाढला होता. आज सकाळी प्रकल्पाच्या तिन्ही गेट मधून सुमारे दोन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग अंजनी नदीच्या पात्रात करण्यात आला. नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे नदी पात्रातील सर्व घाण वाहून जाण्यास मदत झाली असून पात्र स्वच्छ झाले आहे.

अंजनी नदीला पूर आल्यामुळे नागरिकांनी नदी परिसरात पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती. सलग तीन वर्षांपासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर झाली आहे. प्रकल्पाचे वाढीव उन्चीसः काम पूर्ण झाले आहे, मात्र वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाची समस्या अद्याप दूर झालेली नसल्यामुळे प्रकल्पात जलसाठा होण्यास अडचण होते. त्यामुळे दरवर्षी प्रकल्पातून अंजनी नदीच्या पात्रात पाणी वाहून जात असल्यामुळे एरंडोल व धरणगाव तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहत आहे. अंजनी नदीच्या पात्रात प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.तालुक्यात दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावासामुळे कापूर, सोयाबीन आणि ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबई बुडतेय का? मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प, रस्ते-रेल्वे-हवाई सेवा विस्कळीत, नागरिक हैराण... फोटोतून पाहा भीषणता!

IPO Update: गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! आज 5 मोठे आयपीओ उघडणार; जाणून घ्या प्राईज बँड

Diwali Gift: टीव्ही 10,000 रुपयांपर्यंत स्वस्त होणार; एसी आणि गाड्यांच्या किमतीही कमी होणार, काय आहे कारण?

Latest Marathi News Live Updates : मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ठप्प, ठाण्यात प्रवासी रुळावर उतरले

Kolhapur Highway Flood : कोल्हापुरात राष्ट्रीय महामार्गावर पाणी, कोकणात जाणारे दोन घाट बंद; अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT