Anjani Dam
Anjani Dam 
जळगाव

अंजनी प्रकल्पात 80 टक्के जलसाठा..सिंचनाची समस्या दूर

सकाळ वृत्तसेवा


एरंडोल : शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविणाऱ्या पळासदड (ता.एरंडोल) येथील अनजानी प्रकल्पातील (Anjani Dam) जलसाठा ऐंशी टक्क्यांवर पोहोचल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रकल्पात समाधानकारक (Water Crisis) जलसाठा झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची समस्या दूर झाली आहे.


पळासदड येथील अंजनी प्रकल्पातून शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत तालुक्यात तसेच अंजनी नदीच्या उगमस्थळ परिसरात समाधानकारक पाउस न झाल्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झालेली नव्हती.अंजनी प्रकल्पाच्या वर चौदा बंधारे असल्यामुळे जोपर्यंत सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरत नाही तोपर्यंत प्रकल्पात जलसाठा होऊ शकत नसल्यामुळे नागरिकांसह शेतकरी देखील चिंताग्रस्त झाले होते. सप्टेंबरमध्ये सर्वत्र जोरदार पाउस झाल्यामुळे प्रकल्पाच्या वर असलेले सर्व चौदा बंधारे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागल्यामुळे प्रकल्पात पाण्याची आवक वेगाने सुरु होऊन प्रकल्प सुमारे ऐंशी टक्के भरला आहे.

अंजनी प्रकल्पातून एरंडोल शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच अंजनी नदीवर असलेल्या काळ्या बंधाऱ्याच्या माध्यमातून रब्बी पिकांसाठी आवर्तन सोडण्यात येते,तर डाव्या आणि उजव्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे विहिरींच्या पातळीत मोठी वाढ होऊन शेतक-यांना दिलासा मिळत असतो. काळ्या बंधाऱ्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येत असते. अंजनी प्रकल्पामुळे शहराची पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर झाली आहे.

पाण्याची समस्या दुर

शहराची पाण्याची समस्या दूर झालेली असल्यामुळे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढत असून अनेक नवीन वसाहती निर्माण होत आहेत.अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीसह बांधकाम पूर्ण झाले आहे मात्र वाढीत क्षेत्रात बुडीत होणाऱ्या तीन गावांचे पुनर्वसन न झाल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा होऊ शकत नाही.प्रकल्पाच्या वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या गावांचे पुनर्वसन केल्यास एरंडोलसह धरणगाव तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होऊन दोन्ही तालुक्यातील अनेक दुष्काळग्रस्त गावांची पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT