home quarantine
home quarantine 
जळगाव

पॉझिटिव्ह आहात...पण लक्षणे नाही, मग काय घरी विलगीकरणात रहा.. ते कसे, वाचा सविस्तर !

सकाळवृत्तसेवा

जळगाव :  जिल्ह्यात कोरोनो बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णांना रुग्णालयात ऍडमिट व्हावे लागते आहे. जिल्ह्यातील अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना जर त्यांच्या घरात सुविधा असतील तर त्या रुग्णांना त्यांच्या संमतीने घरी विलगीकरणात राहता येणार आहे. ही सुविधा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपलब्ध होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत. 

कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणे नसलेले, सौम्य व अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांमध्ये वर्गीकृत करण्यात येत आहे. त्यानुसार रुग्णांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात येते. आता घरात योग्यप्रकारे सुविधा असलेल्या, पण लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाही घरी विलगीकरणाचा पर्याय असणार आहे. गृह विलगीकरणासाठी परवानगी मागणाऱ्या कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरामध्ये केवळ एकच कुटुंब वास्तव्यास असावे. विलगीकरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या घरामध्ये स्वतंत्र शौचालय व बाथरुम सुविधा असणाऱ्या किमान स्वतंत्र बेडरुम, स्वतंत्र खोल्या असणे आवश्‍यक असेल. याबाबतची खातरजमा कार्यक्षेत्रातील तलाठी व आरोग्यसेवक यांनी करावयाची आहे. 

महापालिका क्षेत्रात आयुक्त व उर्वरित क्षेत्रात तहसीलदार यांनी खातरजमा करावयाची आहे. स्वतंत्र गृह विलगीकरणासाठी परवानगी मागणाऱ्या व्यक्तीला त्याच्या घराच्या दोन्ही बाजूस राहणाऱ्या कुटुंबांचे, अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या संबधीत मजल्यावरील इतर शेजारील कुटुंबांचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. 


प्रतिज्ञापत्र बंधनकारक 
धाप लागणे, श्वासोच्छवासास अडथळा निर्माण होणे, छातीत सतत दुखणे, वेदना होणे, संभ्रमावस्था, ओठ, चेहरा निळसर पडणे इत्यादीपैकी कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्यानुसार संदर्भ सेवेची मदत घ्यावी. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी गृह विलगीकरणासाठी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्‍यक राहील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Meta AI : व्हॉट्सअ‍ॅपवर कसं वापरायचं 'मेटा एआय'? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT