Jalgaon aurangabad highway
Jalgaon aurangabad highway Jalgaon aurangabad highway
जळगाव

जळगाव-औरंगाबाद महामार्गासाठी शेगाव, बारामतीहून वाळू; कामात १८४ ब्रास अवैध वाळू

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जळगाव- औरंगाबाद महामार्गाच्या (Jalgaon aurangabad highway) कामात भवानी फाटा (नेरी) जळगाव ते औरंगाबाद रस्तादरम्यान २० किलोमीटरच्या कामासाठी १८४ ब्रास अवैध वाळूचा वापर करण्यात आला. याप्रकरणी जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी महामार्गाचे कंत्राटदार स्पायरोधारा जे. व्ही. कन्स्ट्रक्शनवर वाळूसाठ्याच्या बाजारभावाच्या पाचपट ३८ लाख चार हजार १६ रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्याबाबतची नोटीस कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक पी. व्ही. श्रीनिवास यांना तहसीलदारांनी दिली आहे. (jalgaon-aurangabad-highway-work-valu-baramati-and-shegaon)

जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Jalgaon collector abhijit raut) यांच्याकडे याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार भवानी फाटा, नेरी जळगाव ते औरंगाबाद रस्ता या २० किलोमीटरच्या कामासाठी अवैध वाळूचा उपयोग झाला आहे. याबाबत जिल्हा खनिकर्म अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या कामाची प्रत्यक्ष मोजणी केली असता एक हजार पाच ब्रास वाळू या गौण खनिजाचा अवैध साठा आढळून आला आहे.

वाळूची शेगाव येथून उचल

वाळूसाठ्याचा जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तलाठी, तक्रारदार गुप्ता यांच्या उपस्थितीत कंपनीच्या सुनसगाव बुद्रुक येथील साइटवर एक हजार पाच ब्रास वाळूसाठ्याचा पंचनामा करण्यात आला. त्या पंचनाम्याच्या अनुषंगाने कंपनीने जामनेर तहसीलदारांना खुलासा सादर केला आहे. खुलाशाअंती कंपनीने १८४ ब्रास वाळूची शेगाव (जि. बुलडाणा) येथून उचल केलेली दिसते.

३८ लाख रूपयांचा दंड

जळगावच्या अपर जिल्हाधिकारी यांनी वाळू उपशाबाबतचे परमीट बुलडाणा येथील जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे पडताळणीसाठी पाठवले होते. त्यानुसार त्यांनी पत्र पाठवले आहे. पावत्यांनुसार केलेल्या वाळूची उचल ही शेगाव ते बारामती व आळंदी येथे केलेली दिसून येते. जामनेर तालुक्यातील कंपनीची साइट असलेले सुनसगाव बुद्रुक येथील कोणतीही पावती दिसून आलेली नाही. १८४ ब्रास वाळू ही अवैध उत्खनन करून वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासनाने ३८ लाख रुपये दंडाची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT