jalgaon bajar samiti
jalgaon bajar samiti 
जळगाव

बाजार समिती बंदमुळे सहा कोटींची उलाढाल ठप्प 

देवीदास वाणी

जळगाव : भारत बंदमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड बंद होते. मार्केट समितीचे गेटच आज उघडले नाही. यामुळे ना व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करता आली ना बाजार समितीत व्यवहार करता आले. बंद मुळे सुमारे सहा कोटींची उलाढाल आज ठप्प होती. 

बाजार समितीत विविध धान्याचे व्यापारी, गुळाचे व्यापारी, धान्याचे व्यापारी यांची दुकाने आहेत. शेतकऱ्यांचा माल रोज येथे येवून त्याची विक्री होती. ती पूर्णपणे आज बंदी होती. बाजार समितीत सुमारे सव्वाशे ते दीडशे दुकाने आहेत व बाजार समिती अशी एकत्रीत रोज सहा लाखांची उलाढाल होत असल्याची माहिती व्यापारी संजय शाह यांनी दिली. 

धरणगावमध्ये कडकडीत बंद 
धरणगाव : शहरात शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’च्या आवाहनाला सर्वांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतकरी संघटनेसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले होते. 

वरणगावला आठवडे बाजार बंद 
वरणगाव : शहरात महाविकास आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत शंभर टक्के बंद पाळण्यात आला. शहरात आठवडे बाजार असताना बंद ठेवण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी शहरात फिरून दुकानदारांना बंदचे आवाहन केले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी कृषी कायद्याविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, शहराध्यक्ष रवी सुतार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अश्फाक काझी, मनोज देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश भैसे आदी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT