MLA Girish Mahajan 
जळगाव

...तर आम्हाला चित्रपटात भूमिका द्या - गिरीश महाजन

पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया अशी गमतीने मागणी केली.

भूषण श्रीखंडे

जळगाव : भाजपचे नेते (BJP Leader) तथा आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) हे त्यांच्या विधानांनी नेहमी चर्चेत असतात असेच काही जामनेर येथील कार्यक्रम प्रसंगी गिरीश महाजनांनी पक्षाने जर आम्हाला आता उमेदवारी दिली नाही तर चित्रपटात भूमिका द्या..अशी मागणी एका चित्रपट निर्मात्याकडे केली.

जामनेर येथे येथील बाबुराव घोंगडे यांनी हलगट या चित्रपटाचे पोस्टर प्रकाश कार्यक्रम झाला. यावेळी आमदार महाजन बोलत होते. पुढे बोलतांना महाजन म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगट्टीवार, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील व माझी आता आमदारकीच्या सहा टर्म झाल्या आहेत. पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया अशी गमतीने, मागणी भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी चित्रपट निर्माते यांच्याकडे केली.

त्यासाठी इंग्रजी चित्रपट करावा लागेल

आमदार गिरीश महाजन यांच्या विधानावर बोलतांना चित्रपट निर्माते बाबुराव घोंगडे गमतीने म्हणाले, तुमच्यासाठी मग इंग्रजी चित्रपट काढून त्यात काम करण्याची संधी तुम्हाला द्यावी लागेल असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

चित्रपटात जामनेरचे कलाकार

निर्माते बाबुराव घोंगडे म्हमाणे, की हा चित्रपट जामनेरमध्ये निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT