shetki sangh
shetki sangh 
जळगाव

चोपडा शेतकी संघाचे ९१ लाखांचे नुकसान

सुनील पाटील

चोपडा : चोपडा शेतकी संघातील कथित भ्रष्टाचारप्रकरणी सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ अन्वये प्राधिकृत चौकशी अधिकारी डी. सी. शिंदे यांनी चौकशी करून १६ नोव्हेंबर २०१९ मध्ये संस्थेच्या ९१ लाख २७ हजार ९९८ रुपयांच्या आर्थिक नुकसानीस तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असल्याचे चौकशी अहवालात नमूद केले होते. त्यानुसार संस्थेची रक्कम वसूल होण्यासाठी १० डिसेंबर २०१९ ला पत्र दिले असून, तब्बल सात महिने उलटूनही व्यवस्थापक व विद्यमान संचालक मंडळ याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सदर संचालक मंडळास त्वरित बरखास्त करण्यात यावे, प्रशासकाद्वारे सदर रकमेची वसुली करण्यात यावी, अशी तक्रार पुणे सहकार आयुक्त, नाशिक विभागीय सहनिबंधक, जिल्हा निबंधक यांच्याकडे जयदेव देशमुख यांनी दाखल केली आहे. 
संस्थेच्या चौकशीबाबत जयदेव देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक (चोपडा) यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यानुसार चौकशीसाठी उपलेखापरीक्षक सहकारी संस्था डी. सी. शिंदे यांना प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.  त्यांनी चौकशी करून १६ नोव्हेंबर २०१९ मध्ये चौकशी अहवाल सादर केला. यात चौकशीत संस्थेची आर्थिक स्थिती व संस्थेची क्षमता नसतानाही संस्थेत अनावश्यक खर्च, गैरव्यवहार, बेकायदेशीर कामे अशा अनेक बाबींवर संस्थेच्या हिताचा व सभासदांच्या हिताचा, तसेच संस्थेच्या आर्थिक स्थितीचा विचार न करता फारच मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च करून संस्थेचे आर्थिक नुकसान केले असल्याचे दिसून येत आहे. 

...असा आहे ठपका 
संस्थेच्या मालकीच्या जागेचे शासकीय मूल्य ८६ लाख सहा हजार ४०० असताना ही जागा २० लाख २१ हजार एवढी किंमत ठरवून ११ सप्टेंबर २०१२ ला ठराव केला होता. संबंधित जागा विक्री केल्याने शेतकी संघाचे ६५ लाख ८५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित ठराव पोटनियमास अनुसरून नाही. खरेदी २० लाख २१ हजार  रुपये दर्शवून ६५ लाख ८५ हजार रुपयांचे संस्थेचे आर्थिक नुकसान झाले असून, त्याची जबाबदारी ७२ (४) अन्वये नोटिसीत दिली आहेत. यात परिशिष्ट ‘अ’मधील मुद्दा क्रमांक १ नुसार ६५ लाख ८५ हजार ४०० रुपये, तसेच परिशिष्ट ‘अ’मधील मुद्दा क्रमांक २ मध्ये जागा विक्रीची किंमत मालमत्ता विक्री खाती जमा न करता संस्थेने प्लॉट अनामत खाती २० लाख २१ हजार  नावे व्यवहार केला असून, बँक सेव्हिंग भरणा केला आहे. या व्यवहाराबाबत खुलासा दिला नसल्याने संबंधित रक्कम आर्थिक नुकसान करणारी आहे. 


संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT