जळगाव

दुकाने बंद ठेवल्यास कोविडपेक्षा गंभीर स्थिती 

देविदास वाणी

जळगाव : गेल्यावर्षी सहा महिने दुकाने बंद ठेवल्याने आर्थिक फटका बसला. आता पुन्हा लॉकडाऊन जारी झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. दुकाने अशीच बंद राहिल्या कोविडपेक्षा गंभीर स्थिती निर्माण होईल, त्यामुळे दुकाने सुरु करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी आज केली. दुकाने सुरु करण्यास अनुमती न मिळाल्यास सोमवारी रस्त्यावर उतरण्याचा इशारा व्यापाऱ्यांसह भाजप नेत्यांनी दिला. 
फुले मार्केटसह गोलाणी संकुलातील व्यापाऱ्यांनी आज भाजप नेत्यांसोबत जाऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेत चर्चा केली. या वेळी खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, भाजप महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मार्केटचे पदाधिकारी रमेश मताणी, भूषण शिंपी, नरेंद्र कावना, शंकर तलरेजा, सोमन डाहरा, अमर दारा, नामदेव मंधान, मोहन मतानी, संजय विसरानी आदी उपस्थित होते. 


व्यापारी अडचणीत 
गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये सहा-सात महिने दुकाने बंद होती. तरीही दुकानांचे भाडे, मालमत्ताकर, कामगारांवरील खर्च तसेच घरातील खर्च सुरुच होता. मध्यंतरी अनलॉक झाले आणि दोन-चार महिन्यांनी पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाले आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय, दुकानातील कामगारांची उपासमार होणार आहे. 

पाच दिवसांची मुभा 
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची जाणीव आहे. मात्र, त्यासंबंधी सर्व नियम, दिशानिर्देश पाळून किमान आठवड्यातून पाच दिवस दुकाने सुरु करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी या बैठकीतून केली. विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

लवकरच सकारात्मक निर्णय 
जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यापाऱ्यांची भूमिका जाणून घेतली. राज्य पातळीवर त्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेण्याचे सांगितले आहे. शासनाचा निर्णय काय होतो, ते पाहून सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 


सुरवातीला ही महामारी नवीन होती. त्याविरोधात कसे लढणार हे माहीत नव्हते. त्यामुळे लॉकडाऊन पूर्ण देशाने सहन केले. आता तशी स्थिती नाही. २० टक्के लोकांसाठी ८० टक्के जनतेला वेठीस धरुन चालणार नाही. त्यामुळे आठवड्यातून पाच दिवस दिवस मर्यादित वेळेसाठी दुकाने सुरु करण्यास अनुमती द्यावी. 
- उन्मेश पाटील (खासदार)  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईतील धरणातील जलसाठा ८८ टक्क्यांवर, १० टक्के पाणीकपात कधी संपणार? महत्त्वाची माहिती समोर

Pune Bangalore Highway : पहिल्याच पावसात 6 पदरी महामार्गाचे पितळ उघडे! गांधी रुग्णालयाजवळ उड्डाणपुलाची भिंत कोसळली; प्रवास बनला धोकादायक, निकृष्ट कामाबद्दल कारवाई होणार का?

Pune News: आळेफाटा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

Latest Marathi News Live Update : भिवंडी इमारत दुर्घटना : दोषींवर कठोर कारवाईचे आदेश; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी भेट

Tourism: मध्य प्रदेश फिरायला जाणार असाल तर ही बातमी महत्त्वाची; पर्यटन क्षेत्रात होणार मोठे बदल; होमस्टे, जंगल सफारी आणि बरंच काही..

SCROLL FOR NEXT