जळगाव

कोरोना लस जागृतीसाठी मोबाईल प्रभावी ठरणार 

देविदास वाणी

जळगाव  ः कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत लसीची माहिती देण्यासाठी तयार केलेला चित्ररथ जिल्ह्यात प्रभावीपणे जनजागृती करेल. कोरोना लस सुरक्षित असून, त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. 

‘कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत’ या विषयावर जिल्ह्यातील जामनेर, एंरोडल, धरणगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल आणि अमळनेर तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे, तसेच कलापथक मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. त्या वेळी ते बोलत होते


अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे आदी उपस्थित होते. 

पारंपारिक कलेच्या माध्यमातून जनजागृती
जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की लसीकरणाबाबत पारंपरिक कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना कोरोना लसीचे महत्त्व समजण्यास मदत होणार आहे. ही कला जोपासणारे कलाकार व त्यांच्या कलागुणांनाही मोबाईल चित्ररथामुळे वाव मिळणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे सहकार्य लाभले आहे.

संपादन - भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ...अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा करणार, चित्रा वाघ यांना राज नयानींचा इशारा

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

SCROLL FOR NEXT