corona
corona  
जळगाव

जिल्ह्यात उद्रेक सुरुच; कोरोनाचे 132 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणीक वाढतच असून कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे 132 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. यामूळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही 2281 वर पोहचली असल्याने जिल्हयात कोरोनाचा उद्रेक सुरुच असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

राज्यासह देशात कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. दररोज कोरोबाधितांचा आकडा हजारोंच्या संख्येने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात देखील गेल्या दोन महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून शहरपासून ते ग्रामीण भागात देखील आता कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे 132 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा 2281 इतका झाला असलयाने जिल्हा प्रशासनाची चिंता चांगलीच वाढलेली आहे. 

चोपड्यासह जळगावात सर्वाधिक रुग्ण 
जिल्ह्यात बाधितांमध्ये शेकडोच्या संख्येने वाढ होवू लागली आहे. आज 132 नवे रुग्ण आढळून आले असून यामध्ये सर्वाधिक 27 रुग्ण चोपडा तालुक्‍यात आढळून आले आहे. त्यानंतर जळगाव शहरात 18, भडगावात 18, पारोळा 13 तर भुसावळमध्ये 10 रुग्ण आढळून आले आहे. 

असे आढळले रुग्ण 
जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये चोपड्यात 27, जळगाव शहर 18, जळगाव ग्रामीण 6, भुसावळ 10, अमळनेर 2, पाचोरा 5, भडगाव 18, धरणगाव 3, यावल 5, एरंडोल 4, जामनेर 2, रावेर 8, पारोळा 13, चाळीसगाव 7, मुक्ताईनगर 2 तर इतर जिल्ह्यातील 2 असे एकूण 132 रुग्ण आज आढळून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT