coronavirus antibody report 
जळगाव

‘ॲन्टिबॉडी’चा अहवाल आठ दिवसांत 

देविदास वाणी

जळगाव : जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कोरोना ‘ॲन्टिबॉडी’ तयार झाल्या किंवा नाही, याच्या तपासणीसाठी केंद्राच्या पथकाने गेल्या महिन्यात जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन ४०० जणांचे सॅम्पल घेतले होते. त्याचा अहवाल येत्या आठ दिवसांत येणे अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. सी. चव्हाण यांनी ‘सकाळ’ ला दिली. सॅम्पल घेतलेल्या नागरिकांमध्ये ‘ॲन्टिबॉडी’चे प्रमाण किती, याची माहिती सॅम्पलचा अहवाल आल्यानंतर कळणार आहे. या सॅम्पलची तपासणी चेन्नई, नवी दिल्ली येथील संस्थांत सध्या सुरू आहे 

या ठिकाणचे घेतले सॅम्पल 
केंद्रीय पथकाने जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘सिरो सर्व्हे’ केला. त्यात वॉर्ड ५७ (जळगाव महापालिका), वॉर्ड २८ (चाळीसगाव), वॉर्ड ४ (भुसावळ), मोहराळे (ता. यावल), तांदलवाडी (ता. रावेर), कडगाव (जळगाव), धरणगाव, वरखेडे (ता. भडगाव), नाईकनगर (ता. पाचोरा), गोराडखेडा (ता. जामनेर) या ठिकाणच्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने (सॅम्पल) घेतले आहेत. पथकाबरोबर जिल्हा रुग्णालयातील एक डॉक्टर, एक लॅब टेक्निशियन, सहाय्यक आरोग्यसेविका होती. पथकात निरीक्षक म्हणून डॉ. तासखेडकर, डाॅ. मोरे, डॉ. तडवी होते. 

‘कोरोना’च्या टक्केवारीसाठी सर्व्हे 
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मात्र, सर्वसामान्य व्यक्तींमध्ये कोरोनाची लागण कितपत झाली आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘सिरो सर्व्हे’ करण्यात येतो. व्यक्तीच्या रक्तद्रवामधील ॲन्टिबॉडीचा शोध याद्वारे घेतला जात आहे. 
 
ऑक्सिजन बेडचे सोमवारी लोकार्पण 
जिल्हा रुग्णालयातील विविध वॉर्डात ऑक्सिजन बेड तयार करण्याचे काम सुरू होते, ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्हा कोविड रुग्णालयात ३५६ बेड ऑक्सिजनयुक्त आहेत. मात्र दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. त्यात ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात विविध ठिकाणी १८० ऑक्सिजन बेड निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या बेडची आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा कोविड रुग्णालयात जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील आदी उपस्थित होते. येत्या सोमवारी बेडचा लोकार्पण सोहळा होणार आहे. 
 
संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Smart Meter Maharashtra : स्मार्ट मीटरला भाजपच्या मंत्री आमदारांचाच विरोध, ग्रामीण भागात रोष वाढला; स्मार्ट मीटर बसवणे बंद होणार? ऊर्जा मंत्रीचे स्पष्टीकरण

FIFA World Cup 2026 : 16 वर्षांनंतर स्पेनची बाद फेरीत दमदार एन्ट्री! ऑस्ट्रियाला 3-0 ने हरवत राऊंड ऑफ 16 गाठलं

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Khadakwasala Dam Water : खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा वाढू लागला; चार दिवसांच्या पावसाने नेमका काय बदल घडवला?

SCROLL FOR NEXT