jalgaon corporation 
जळगाव

जळगावचा नवीन महापौर कोण? आज होणार निर्णय 

कैलास शिंदे

जळगाव : जळगाव महापालिका महापौर पदाच्या निवडीसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून भाजप महापौर उमेदवारास मुदतवाढ द्यावयाची की नवीन सदस्याना संधी द्यायची; याबाबत भाजप नेते गिरीश महाजन आज निर्णय घेणार आहेत. 
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची अडीच वर्षाची मुदत संपली आहे. नवीन निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्‍या १८ मार्चला निवड केली जाणार आहे. त्यासाठी मंगळवारपासून (ता. ९) अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत असून त्यांचे ५७ नगरसेवक आहेत. तर विरोधी पक्षातील शिवसेनेचे १५, एमआयएमचे तीन नगरसेवक आहेत. महापौर पद ओबीसी महिला गटासाठी राखीव आहे. तर उपमहापौरपद सर्वसाधारण खुले होते. आताही तीच स्थिती आहे. सद्यस्‍थितीत महापौरपदी भारती सोनवणे; तर उपमहापौर पदी सुनील खडके आहेत. 

भाजपमध्येच धुसफूस
महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत असले तरी पक्षांगत धुसफूस मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने ते भाजप विरोधात आपली ताकत दाखवण्याच्या तयारीत आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी पक्षाचा एकही नगरसेवक नाही. मात्र महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना नगरसेवकांनी खडसे यांची मध्यंतरी भेट घेतली होती. 

तर भाजपच्या सत्‍तेला धोका
भाजपचे काही नगरसेवक खडसे यांच्या संपर्कात आहेत. अशा स्‍थितीत शिवसेनेने ही निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे. जर निवडणूक झाली तर भाजपला सांगली महापालिकाप्रमाणे धोका होऊन सत्ता जाण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत विद्यमान महापौर, उपमहापौर यांनाच मुदतवाढ देण्याची चर्चा सुरू आहे. तर नवीन नगरसेवकांना संधी द्यावी अशी मागणीही पक्षातून होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे. गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की जळगावला जावून त्याबाबत चर्चा करून निर्णय घेणार आहोत. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: सीएसएमटी-गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमके कारण काय?

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या इमारतीवर डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा फलक; अधिकारी गैरहजर अन् पोलिसांसमोरच चिटकवली अक्षरे, नामकरणावरून गोंधळ सुरु

Numerology: लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असतात 'या' ३ जन्मतारखा असलेले लोक; करिअरमध्ये मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वंचितांचा आवाज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Solapur Road Accident: एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; बस चालकासह एका प्रवाशी महिलाचा मृत्यू ; दहा जण जखमी

SCROLL FOR NEXT