Jalgaon_Municipal_Corporation
Jalgaon_Municipal_Corporation 
जळगाव

कोरोना संसर्ग वाढल्यास महापालिका प्रशासन जबाबदार...आयुक्तांना तंबी

सकाळवृत्तसेवा

जळगाव: महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची, तसेच मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आवश्‍यक त्या उपाययोजना करीत नाही. आयुक्तांनी ताबडतोब लक्ष देऊन उपाय सुरू करावेत, अन्यथा वाढत्या संसर्गाला महापालिका अधिकारीच जबाबदार असतील, अशी तंबी भाजपचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांनी महापालिका आयुक्त सतीश कुळकर्णी यांना दिली आहे. त्यांनी आयुक्तांना लेखी पत्रच दिले आहे. 


दरम्यान, महापालिकेतर्फे संसर्ग रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप थेट भाजपचे आमदार भोळे यांनीच केला आहे. विशेष म्हणजे महापालिकेवर भाजपचीच सत्ता आहे. तरीही त्यांनी प्रशासनावर आरोप केल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 


जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शहरात सद्य:स्थितीत 894 रुग्ण आहेत. शहरात 40 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात खाटा फुल झाल्या आहेत. क्वारंटाइन केंद्रेही फुल झाली आहेत. शहरातील अनेक भाग "हॉटस्पॉट' झाले आहेत. अशा स्थितीत महापालिकेकडून तातडीने आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र, त्या उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी आहेत. 


आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले, की कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत आपण आयुक्तांना तीन पत्रे दिली आहेत. त्यात त्यांना शहरात वैद्यकीय टीममार्फत घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करण्याबाबत सुचविले आहे. 

आयुक्तांच्या कामावर बोट 
प्रभाग अधिकाऱ्यांना त्या-त्या भागात तपासणी करून त्याचा अहवाल रोज मागवावा, असेही आपण सुचविले. त्यावर त्यांनी आपण चाचणी सुरू करीत आहोत, असे सांगितले. अद्याप ती सुरू केलेली नाही. शहरात वाढती गर्दी लक्षात घेऊन बाजारपेठेतही उपाययोजना करण्याबाबत सुचविले. सामाजिक संस्थांचे सहकार्य घेऊन काही मंगल कार्यालये, होस्टेल व हॉल या ठिकाणी सुविधा करावी, अशी मागणी केली. मात्र, आयुक्तांनी अद्यापपर्यंत सामाजिक संस्थांची बैठकही घेतलेली नाही. आयुक्त उपाययोजनांबाबत दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला, तर त्याची जबाबदारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची असेल, असेही आपण त्यांना सुचविले आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT