crime 
जळगाव

पिडीतांना न्याय देण्यासाठी गुन्ह्यांचा तपास जलद करा- राऊत

पिडीतांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहू नये याकरीता पोलीस विभागाने आवश्यक ते नियोजन करावे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ःपिडीतांना जलदगतीने न्याय देण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत (Laws) दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने पूर्ण करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijeet Raut) यांनी दिल्या.


जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


पिडीतांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहू नये याकरीता पोलीस विभागाने आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती घेऊन पिडितांना नियमानुसार अर्थसहाय्य तातडीने मंजूर करण्याच्याही सूचना दिल्यात.


अकरा पिडीतांना अर्थ सहाय्य
समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी जुलैअखेर अनुसूचित जातीची ७ तर अनुसूचित जमातीची ६ असे एकूण १३ गुन्हे पोलीस तपासावर असल्याची माहिती बैठकीत दिली. त्यापैकी ७ गुन्ह्यांची निर्गती पोलीस विभागाने केली आहे. उर्वरित ६ व ऑगस्टमध्ये नव्याने दाखल झालेले ६ असे एकूण १२ गुन्हे पोलीस तपासावर असल्याचे सांगितले. ऑगस्ट महिन्यात ११ पिडीतांना १५ लाख ४३ हजार ७५० रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती श्री. पाटील यांनी बैठकीत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT