ATM theft 
जळगाव

जळगावः धानोऱ्यात चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळविले..

सीसीटीव्ही फुटेज मध्ये रात्री दोन वाजेच्या सुमारास ट्रक रस्त्यावरून गेल्याचे दिसत असल्याने यातच एटीएम मशीन टाकून नेले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे.

अमोल महाजन

धानोरा (ता.चोपडा) ः धानोऱ्यात तर चोरट्यांनी इंडीकॅश बँकेचे एटीएम (ATM)फोडून चोरी (Theft) करण्याच्या इराद्याने आले, परंतू एटीएम मशीन फोडता आले नसल्याने चोरांनी चक्क एटीएम मशीनचीच चोरी केली आहे. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. वाढत्या चोरी आणि दरोडेखोरीच्या घटनांमुळे (Crime) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ATM theft

अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर असलेल्या धानोरा (ता.चोपडा) येथील ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या इंडीकॅश बॅंकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळविले आहे. पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरांना एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे चोरांनी चक्क एटीएम मशीनच चोरुन नेले. ही घटना बुधवारी (ता.२०) मध्यरात्री घडली. गुरुवारी (ता.२१) सकाळी गावातील पोलिस पाटील दिनेश पाटील यांनी घेतनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. एटीएम मध्ये अंदाजे दीड दोन लाख रुपयांची रक्कम असल्याचे समजते. तर जवळपास असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये रात्री दोन वाजेच्या सुमारास एक मोठा ट्रक या रस्त्यावरून गेल्याचे दिसत असल्याने यातच एटीएम मशीन टाकून नेले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

सुरक्षारक्षकाची नियुक्ती नाही

अनेक वेळा याच ठिकाणचे एटीएम मशीन फोडण्याचे प्रकार झाले आहेत. विशेष म्हणजे अद्यापही त्या चोरीचा तपास लागलेला नाही. चोरीच्या या प्रकारानंतर देखील बॅंकेच्या व्यवस्थापनाकडून या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली नाही. तसेच एटीएमच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधीची तक्रार दाखल करण्यास असमर्थता दर्शवली केली असल्याचेही समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT