Jalgaon District Bank 
जळगाव

जळगाव जिल्हा बँकेत भाजपची माघार..निवडणूकीवर बहिष्कार

राष्ट्रवादी त्यांतर शिवसेनेकडून बीजेपी सोबत जाण्यास नकार दर्शविला होता.

सकाळ डिजिटल टीम

जळगाव ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी (Jalgaon District Bank)आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांनी माघार घेत निवडणूकीवर (Election) बहिष्कार टाकला. भाजपने निवडणूकीत माघार घेत राजकीय खळबळ उडाली आहे. यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जिल्हा बँकेवर झेंडा फडकल्याचे ही स्पष्ट झाले आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणूकीत आधी सर्व पक्षीय पॅनलची चर्चा होती. पंरतू काँग्रेस पक्षाने बीजेपी सोबत जाण्यास नकार घेतल्यानंतर राष्ट्रवादी त्यांतर शिवसेनेकडून बीजेपी सोबत जाण्यास नकार दर्शविला होता. त्यानंतर महाविकास आघाडी विरुध्द भारतीय जनता पार्टी पॅनलच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतू आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या सर्वच उमेदवारांनी माघार घेत निवडणूकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.

महाविकास आघाडी भक्कम..

जिल्हा बँक निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जागा वाटप करून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपकडून देखील उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यात खासदार रक्षा खडसे सारखे यांचा उमेदवारी अर्ज बाद तसेच अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने निवडणूकीत भाजप शक्ती कमी पडणार असल्याचे चित्र होते.

बँकेत केवळ राजकारण- महाजन

भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी जिल्हा बँक निवडणूकीत बॅंकेत केवळ राजकारण सुरू असून शेतकऱ्यांच्या हिताला काळे फासले जात असल्याचा आरोप करत निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT