MLA Girish Mahajan 
जळगाव

जिल्हा बँक निवडणूक: भाजप स्वतंत्र लढणार- गिरीश महाजन

दोन- तीन बैठका झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी ही भूमिका घेतली. सहकारात पक्ष नको म्हणून आम्ही सर्वपक्षीय पॅनलची भूमिका घेतली होती.

सकाळ वृत्तसेवा


जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत (Jalgaon District Bank Election) सर्वपक्षीय पॅनल निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, काँग्रेस पक्षाने भाजपसोबत (BJP) जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही (Nationalist Congress Party) भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाजप ही निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असून, सर्व २१ जागांवर आज भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. भाजप नेते गिरीश महाजन (MLA Girish Mahajan)यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


श्री. महाजन म्हणाले, जिल्हा बँक निवडणूक लढविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. यात सर्व २१ जागांवर भाजपचे उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत आघाडी न झाल्यास भाजप स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीची भूमिका संशयास्पद
राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने सर्वपक्षीय पॅनलमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आम्हाला, वरिष्ठांनी भाजपसोबत न जाण्याचे सांगितले, असे सांगत सर्वपक्षीय पॅनलमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली आहे. वास्तविक दोन- तीन बैठका झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी ही भूमिका घेतली. सहकारात पक्ष नको म्हणून आम्ही सर्वपक्षीय पॅनलची भूमिका घेतली होती. परंतु, अजूनही माघारीपर्यंत आम्ही आघाडीवर ठाम आहोत. मात्र, काहीच निर्णय न झाल्यास आम्ही सर्व २१ जागांवर उमदेवार उभे करणार आहोत. खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT