जळगाव

आमदार महाजनांचा अर्ज वैध, तर बाद उमेदवारांचे ठिय्या आंदोलन

अर्ज बाद ठरविल्याने निवडणूक अधिकारी यांनी अर्ज वैध करण्यासाठी पन्नास हजाराची लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडून दिली.

भूषण श्रीखंडे

जळगावः जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणूकीत (Jalgaon District Bank Election) उमेदवारी अर्जांची पडताळणी तसेच हरकत आलेल्या अर्जावर सुनावणी बुधवारी झाल्या. त्यात जामनेर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan), अलका पाटील यांचे अर्ज वैध ठरविले असल्याची माहिती समोर येत आहे. तर जिल्हा परिषद सदस्या माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांच्याकडे सहीसाठी उपनिबंधकांनी ५० हजार रूपयांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तर अन्य चार उमेदवारांचे अर्ज बाद केल्याने त्यांनी देखील ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणूकीची अर्ज पडताळणी व त्यावर आलेल्या हरकतीवर सुनावणी बुधवारी घेण्यात आल्या. यात अनेक दिग्गज नेत्यांच्या अर्जावर हरकती आल्यानंतर आज निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय देणार आहे. त्यात आमदार गिरीश महाजन, अलका पाटील यांचे अर्ज वैध ठरविले आहे. तर जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्या माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांचा अर्ज बाद ठरविल्याने निवडणूक अधिकारी यांनी अर्ज वैध करण्यासाठी पन्नास हजाराची लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडून दिली.

बँकेतच ठिय्या आंदोलन

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत मुद्दाम डावलण्यात येत असल्याच्या आरोपावरून जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. हे आंदोलन सुरू झाल्यानंतर मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून अर्ज बाद करण्यात आलेले नाना पाटील यांनी कर्ज घेतले नसतांना देखील कर्जदार दाखवून आपल्याला बाद केल्याचा आरोप करत आंदोलन सुरू केले. तर माजी आमदार स्मिता वाघ यांनीही गैरव्यवहाराचा आरोप केला. यासोबत भालोद येथील भारती नारायण चौधरी यांच्यातर्फे त्यांचे पती नारायण शशिकांत चौधरी यांनीही ठिय्या आंदोलनाच सहभाग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT